अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटचे उद्घाटन नामवंत सोळा संघ सहभागी
(रविंद्रसिंघ मोदी)
नांदेड 10 जानेवारी : मागील पन्नास वर्षांपासून नियमितपणे आयोजित होत असलेली प्रतिष्ठित अशा अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट स्पर्धेचे बुधवार, सकाळी 11.30 खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम मैदानावर उद्घाटन पार पडले. गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुरसाहेबचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, सहायक जत्थेदार संतबाबा रामसिंघजी, गुरुद्वारा श्री लंगरसाहिबचे मुखी संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, गुरुद्वारा मातासाहिब देवाजी येथील जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. ठानसिंघ बुंगाई, स. बरियामसिंघ नवाब, गुरचरनसिंघ घडीसाज, रविंद्रसिंघ बुंगाई, डॉ हरदीपसिंघ खालसा, जगजीतसिंघ चिरागिया, रणजीतसिंघ चिरागिया, नानकसिंघ घडीसाज, अमितसिंह तेहरा, श्री खांडागले, गुरबचनसिंघ बाबा, नरेंद्रसिंघ लिखारी, अजितसिंघ जालनेवाले यांची प्रमुख उपस्थिती होती. दुष्ट दमन क्रीडा युवक मंडळ नांदेडचे अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक स. गुरमीतसिंघ नवाब आणि आयोजन समिति सदस्यांनी उद्घाटक आणि प्रमुख अतीथींचे सत्कार केले.
नांदेड येथे वर्ष 1972 पासून श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या जन्मोत्सवास समर्पित राष्ट्रीयस्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन होत असून यंदाची ही सुवर्ण महोत्सवी स्पर्धा आहे. कोविड संक्रमण वर्ष 2020 चा अपवाद सोडल्यास वरील स्पर्धा सतत नियमित खेळविली गेली. हे वर्ष स्पर्धेचा 50 वां वर्ष असल्यामुळे स्पर्धेच्या आयोजनास विशेष महत्व प्राप्त झाले आहे. नांदेड सारख्या शहरात मागील 50 वर्षांपासून ही स्पर्धा इतिहास घडवत आहे. या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू सहभाग करतात. देशातील मोठे आणि नावलौकिक असलेले संघ शहरात येऊन आपले खेळ-कौशल्याचे प्रदर्शन करतात.
महाराष्ट्रात सतत आठवडाभर चलणाऱ्या हॉकी स्पर्धा विषयी आयोजक गुरुमितसिंग नवाब पुढे म्हणाले की, पन्नासाव्या स्पर्धेचा आज शुभारंभ होतांना अतिशय आनंद होत आहे. आमच्यावतीने आज गैलिबोळीतील 50 गरीब मुलांना हॉकीची किट भेट देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड, गुरुद्वारा श्री लंगरसाहिब, गुरुद्वारा नानक झीरा साहिब बीदर, नांदेड वाघाला महानगर पालिका आणि हॉकी इंडिया यांच्या सहकाऱ्यांनी आणि दानशुर व्यक्तिच्या मदतीने या स्पर्धा आयोजित होतात आणि यशस्वीरीतिया पार पडतात. शिरोमणी दुष्ट दमन क्रीडा युवक मंडळ आयोजन समितीतील सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच सल्लागार तीन महिन्यापासून तयारीला सुरुवात करतात.
उपाध्यक्ष जितेंदरसिंघ खैरा, सचिव हरविंदरसिंघ कपूर, कोषाध्यक्ष हरप्रीतसिंघ लांगरी, सहसचिव संदीपसिंघ अखबारवाले, सदस्य महिन्दरसिंघ लांगरी, जसपालसिंघ काहलों, अमरदीपसिंघ महाजन, विजय नंदे, प्रा. जुझारसिंघ सिलेदार, सरदार खेमसिंघ यांचे मोलाचे सहकार्य मिळते. यावर्षी हॉकी इंडियाच्या नियमानुसार स्पर्धेत एकूण सोळा संघ सहभागी झाले आहेत. त्यात ए.एस.सी. जालंधर, पंजाब पोलीस, एसजीपीसी अमृतसर, ईस्टर्न रेलवे कोलकाता, साईं एक्सेलेंसी सुन्दरगढ, सैफई इटावा, कस्टम मुंबई, एमपीटी मुंबई, रिपब्लिकन मुंबई, साईं एक्सेलेंसी औरंगाबाद, पुणे डिवीजन, दिल्ली यूनिवर्सिटी, आर्टलेरी नासिक, अमरावती, युथ खालसा नांदेड व नांदेड हॉकी संघ या संघाचा सहभाग आहे. यावर्षी शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटी अमृतसर संस्थेचा संघ सहभागी होत असल्याचा विशेष आनंद आहे. हॉकी स्पर्धा आयोजन समितितील सदस्य दिवंगत जसबीरसिंघ चीमा यांना श्रद्धांजलि देण्यात आली.