जिला

माळेगाव यात्रेत भाविकांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ठिकठिकाणी शौचालयाची सुविधा

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा मीडिया सेंटर 10- जिल्हा परिषदेच्या वतीने माळेगाव यात्रेत यावर्षी विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.  माळेगाव यात्रेत ठिकठिकाणी यावर्षी यात्रेत नवीन पाच शौचालयाचे युनिट उभारण्यात आले आहे. एमएसईबी स्टॉलच्या परिसरात एक युनिट, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी शौचालयाची युनिट, महादेव मंदिर परिसर, जिल्हा परिषद भांडार गृहाच्या समोर, चादर-बेडशिट लाईन व पाण्याच्या टाकीजवळ एक असे नवीन शौचालयाची सुविधा आहे. तसेच यापूर्वीचे शौचालयाची दुरुस्ती  करुन सदर शौचालय सुरु केले आहेत. बनवस बायपास, पोलीस चौकीच्या मागे व पोलीस चौकीच्या समोर तसेच बीएसएनएलच्या स्टॉलच्या जवळ शौचालय सुविधा देण्यात आली आहे.
          
 फिरत्याते शौचालय 
      याशिवाय फिरत्या शौचालयाची सुविधाही यात्रेत ठेवण्यात आले आहेत. दहा-दहा युनिटचे चार फिरते शौचालय माळेगाव यात्रेमध्ये आहेत. लावणी महोत्सव परिसर, बस स्थानक परिसर, कृषी स्टॉल आदी परिसरात फिरते शौचालय ठेवण्यात आले आहेत. ग्रामीण पाणी पुरवठाच्या वतीने सदर शौचालयास  टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जार आहे. 
       जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या पुढाकारातून यावर्षी माळेगाव यात्रेत मोठ्या प्रमाणात शौचालयाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले,
 उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा माळेगाव यात्रा सचिव मंजुषा कापसे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी पुढाकार घेऊन माळेगाव यात्रेत  सुविधा दिल्या आहेत. यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात शौचालयाची सुविधा दिल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्लास्टिकमुक्त यात्रेचा संकल्प
नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच प्लास्टिकमुक्त यात्रेचा संकल्प केला आहे. माळेगाव यात्रेत ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी लोहा ग्रामपंचायत संघटनेनेही पुढाकार घेतला आहे.
       यात्रा परिसरामध्ये कृषी स्टॉल, बचत गट, सटवाई मंदिर, जिल्हा परिषद भांडारगृह, मंदिर परिसर, सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह, पोलीस चौकी, जिल्हा परिषद शाळा, अहमदपूर बसस्थानक ,लातूर बसस्थानक व नांदेड बसस्थानक आदी परिसरामध्ये कचराकुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. दरम्यान लोहा ग्रामपंचायत संघटनेनेही प्लास्टिकमुक्ती संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या संकल्पनेला सहमती दर्शवत प्रत्यक्ष माळेगाव यात्रेत प्लास्टिक संकलन करणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष गजानन शिंदे व सचिव शैलेश बिस्मिल्ले यांनी ही माहिती दिली. या सोबतच कृषी तांत्रिक संघटनाचे अरुण चौधरी, सय्यद इब्राहिम, ग्रामसेवक संघाचे मधुकर मोरे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या निर्णयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल तसेच ग्रामपंचायत माळेगाव यात्रा यांनी स्वागत करुन अभिनंदन केले आहे.
       तसेच जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटांच्या स्टॉलमध्येही कापडी पिशव्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एक, दोन  व पाच रुपये असे दर ठेवण्यात आले आहेत. तरी भाविकांनी कापडी पिशव्या घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button