मराठवाडा
नांदेड जिल्हा पोलीस दल सीसीटीएनएस कामगिरीमध्ये राज्यात प्रथम
अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कडुन पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरी बाबतचा आढावा दर महा घेण्यात येतो राज्यातील सर्व घटकांचे माहे नोव्हेंबर -2022 मधील सीसीटीएनएस मासिक कामगिरी अहवालांचे अवलोकन करुन देण्यात आलेल्या गुणांकनानुसार नांदेड जिल्हयाने राज्यात ( 1 ) प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये नांदेड जिल्हयातील 36 पोलीस स्टेशन येथे दाखल होणारे प्रथमखबर, घटनास्थळ पंचनामे, आरोपी अटक, मालमत्ता जप्ती, दोषारोप पत्र न्यायालयीन निकाल, हरवलेले इसम अनओळखी मयत, अदखलपात्र खबर, गहाळ / बेवारस मालमत्ता, प्रतीबंधक कार्यवाही व ईतर नोंदी अश्या एकुण 18 प्रकारच्या माहितीची सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये मध्ये नोंदी करण्यात येतात. तसेच सीसीटीएनएस प्रणालीचा दैनदिन कामकाजात वापर करुन गुन्हे प्रतिबंध, गुन्हे उघडकिस आणुन चांगली कामगिरी करण्यात आली तसेच ITSSO, ICJS व CRI-Mac पोर्टलाचा प्रभावीपणे वापर केल्याने माहे नोव्हेंबर- 2022 मध्ये नांदेड जिल्हयाने 342 गुणांपैकी 307 गुण मिळवुन महाराष्ट्र राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस नोडल अधिकारी मा. अपर पोलीस अधीक्षक, नांदेड श्री अबिनाश कुमार व मा. अपर पोलीस अधिक्षक भोकर श्री डॉ. खंडेराय धरणे व त्यांची सीसीटीएनएस टीम पोउपनि/रहिम बशीर चौधरी, मपोउपनि/ प्रणीता राजाराम बाभळे, पोलीस नाईक समीरखान मुनीरखान पठाण, पोलीस नाईक ओंकार सुरेश पुरी, पोलीस अंमलदार माधव नारायण येईलवाड यांचे अथक परिश्रमामुळेच नांदेड पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.