सोलापूर :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांचे मार्फत दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे प्र.सहायक आयुक्त ह.श्री.नलावडे यांनी दिली .
या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, ट्रेनी, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट अशा प्रकारची एकुण 470 पेक्षा जास्त रिक्तपदे 3 उद्योजकांनी अधिसुचीत केलेली आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल.
अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 0217-2950956 या दुरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापुर येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्र.सहायक आयुक्त श्री.नलावडे यांनी केले आहे.
Discussion about this post