माउली’ तेल नावाने गुरुजींचा प्रताप.. धर्माबादकराणों सुट्या भेसळयुक्त तेलापासून सावधान!
धर्माबाद:- म. मुबशिर / गेल्या दोन वर्षापासून धर्माबाद शहरात सुट्या भेसळयुक्त तेलाचे प्रकोप वाढले असुन भेसळयुक्त तेलाची सरास विक्री होत आहे. सविस्तर व्रत असे की, शहरातील महाराष्ट्र बस स्थानक जवळ असलेले माउली तेलाच्या नवाने सुट्या भेसळयुक्त तेलाची खुलेआम विक्री केली जात आहे. पेशा शिक्षकाचा आणि कारभार भक्षा चा करत असल्याने शहरात चर्चा रंगली आहे. एका जिल्हा परिषदेचा शिक्षक जास्त रुपये कमविण्या लालचपोटी सुट्या भेसळयुक्त तेलाचे टाक्या चे टाक्या दररोज खाली करत आहे आणि रिपॅकिंग च्या नावाखाली धर्माबाद तालुक्याला भेसळयुक्त तेल बिनधास्तपणे विक्री करत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या आशीर्वादाने हा गोरख धंदा सुरू आहे.
तपासाच्या नावाखाली अधिकारी आपल्या खिशा गरम करण्यात मग्न आहे.राज्य सरकारने सुट्या तेल विकणे व्यवहारावर बंदी घातली असुन गुरुजींचा प्रताप असा की, खुला तेलाची ब्यारेल मागवून रिपॅकींगच्या नावाने माउली तेलाच्या स्टिकर चीपकवून धर्माबाद शहरात प्रत्येक किराणा दुकानावर विक्री करत आहे. ऐखाद्या कंपनीने तेल चे डब्बे पॅक करुन सील मारून देत असेल तर गुरूजी रीपॅकिंग कोणत्या तेलाची करत आहे..? असा प्रश्न निर्माण होत असून माउली या नावाने गुरुजीची कंपनी रजिस्टर नाही आणि ट्रेडमार्क व आय एस.आय ISI मार्क सुद्धा नसून मग या माउलीला कोण सावली देत आहे.
तेल तय्यार करुन बाजारात विकणे यासाठी शासनाचे खूप कडक अटी व नियम आहेत आपल्या फायद्यासाठी सगळे अटी व नियम गुरूजींनी धाब्यावर बसवून भोळ्या भाबड्या लोकांच्या जीवनाशी खेळत असून या सुट्या तेलाने अनेक प्रकारचे रोग होत आहे महत्वाचे म्हणजे जास्त करुन हार्टटॅक येण्याची दाट शक्यता आहे. पगार शासनाचा काम सावकरीचा करत असल्याने गुरूजी विद्यार्थांना कायतरी शिकवत असतील..?असा प्रश्न निर्माण होत आहे. रीपॅकींग च्या नावाने रिफाईंड माउली तेल विक्री करणाऱ्या या गुरूजीच्या बोगस कारभाराला अंकुशलावून भेसळयुक्त तेलाचे साठाकरून विकणाऱ्या माउली तेलाच्या रिपॅकींगवर सील मारून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.