श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड एंड सिल्वर कप टूर्नामेंटचे 10 जानेवारी रोजी उद्घाटन! सोळा संघ सहभागी होणार
नांदेड दि. 8 जानेवारी : शिरोमणि दुष्टदमन क्रीडा युवक मंडळ नांदेड द्वारा संचालित 50 वीं श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटचे उद्घाटन बुधवार, दि. 10 जानेवारी रोजी सकाळी 11.30 करण्यात येणार असल्याची माहिती हॉकी आयोजन समेतीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक स. गुरमीतसिंघ बरियामसिंघ नवाब यांनी येथे दिली. ते पुढे म्हणाले, स्पर्धेचे उद्घाटन गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहेब चे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, गुरुद्वारा श्री लंगरसाहेबचे मुखी संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवा वाले, मुखी संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवा वाले, गुरुद्वारा मातासाहेब देवाजी जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी यांच्या हस्ते होईल. तर या प्रसंगी गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अधीक्षक स. ठानसिंघ बुंगाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच गुरुद्वारा बोर्डाचे आजी माजी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक आणि माजी नगरसेवक यांना अतिथि म्हणून निमंत्रण देण्यात आलेले आहे.
गुरमीतसिंघ नवाब यांनी माहिती दिली की, नांदेड नगरीत सन 1972 पासून श्री गुरु गोबिंदसिंघजी यांच्या नावाने राष्ट्रीय खेळ हॉकीच्या स्पर्धा घेण्यात येत आहेत. यंदाची ही 50 वीं गोल्डन जुबली वर्ष स्पर्धा आहे. दि. 10 जानेवारी रोजी सुरु होत असलेली वरील स्पर्धा दि. 17 जानेवारी पर्यंत चालेल.
स्पर्धेत एकूण सोळा राष्ट्रीय हॉकी संघ सहभागी होत आहे. वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष जितेंदरसिंघ खैरा, सचिव हरविंदरसिंघ कपूर, कोषाध्यक्ष हरप्रीतसिंघ लांगरी, सहसचिव संदीपसिंघ अखबारवाले, सदस्य महिन्दरसिंघ लांगरी, जसपालसिंघ काहलों, अमरदीपसिंघ महाजन, विजय नंदे, महेंद्रसिंघ गाडीवाले, प्रा. डॉ जुझारसिंघ सिलेदार व आयोजन समिति सदस्य व खेळाडू आयोजन कार्यात परिश्रम घेत आहे.