सागर यादव हथियार कांडच्या आणखी एक आरोपी अटक
सराफा लाईन इतवारा, नांदेड परीसरात दिनांक 06/11/2023 रोजी रात्री 8.00 वाजताचे सुमारास सागर यादव रा. जुनागंज इतवारा, नांदेड याचा काही इसमांनी खुन केला होता त्यावरुन पोलीस ठाणे इतवारा गुरनं. 245/2023 कलम 302, 307, 384, 386, 294, 143, 146, 147, 148, 149, 120 (ब) भा. द. वि. सहकलम 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल असुन नमुद गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याबाबत मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी पथके तयार करुन आरोपीतांना अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
दिनांक 02/01/2023 रोजी स्थागूशा चे पथकातील पोउपनि दत्तात्रय काळे यांना मिळालेल्या माहीतीनुसार नमुद गुन्हयातील एक आरोपी नगीनाघाट, नांदेड येथे असल्याने पोलीस निरीक्षक, स्थागुशा यांनी सदर पथकास नगीनाघाट, नांदेड येथे रवाना केले. स्थागुशा चे पथकाने नमुद ठिकाणी जावुन सापळा रचुन आरोपी नामे 1 संतोष भिमराव सोळंके वय 22 वर्ष व्यवसाय मजुरी रा. गायत्रीमंदीर जवळ, जुना मोंढा, नांदेड यास ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे सांगीतल्याने त्यास पोलीस ठाणे इतवारा गुरनं. 245/2023 कलम 302, 307, 384, 386, 294, 143, 146, 147, 148, 149, 120(ब) भा. द. वि. सहकलम 4/25 शस्त्र अधिनियम गुन्हयाचे पुढील तपासकामी देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि / दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, पोहेकॉ/बालाजी तेलंग, पोकॉ/विलास कदम, विठ्ठल शेळके, गजानन बयनवाड, रणधीर राजबन्सी, ज्वालासिंघ बावरी, कलीम शेख मारोती मुंडे, स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.