ईएमई जालंधर, नाशिक, कस्टम मुंबई आणि दिल्ली पोलीस उपांत्य फेरीत
रविंद्र सिंघ मोदी
नांदेड दि. 27 : मंगळवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरी सामन्यांत ईएमई जालंधर, आर्टलेरी सेंटर नाशिक, कस्टम मुंबई आणि दिल्ली रिजर्व पोलीस संघांनी आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली. तर टूर्नामेंट मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या पंजाब पोलीस जालंधर संघाचे पराभव झाल्याने चाहत्यांनी कडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
आजचा पहिला हॉकी सामना ईएमई जालंधर आणि पंजाब पोलीस जालंधर संघा दरम्यान खेळण्यात आला. यात ईएमई जालंधर ने पंजाब पोलीस संघाचा 1 विरुद्ध 0 गोल अंतराने पराभव केला. खेळाच्या 38 व्या मिनिटास ईएमई च्या पंकज ने मैदानी गोल केले. याच गोलाच्या बळावर ईएमई जालंधर ने उपांत्य फेरी गाठली.
आजचा दूसरा हॉकी सामना आर्टलेरी सेंटर नाशिक आणि पीएसपीएल पटिआला संघा दरम्यान खेळला गेला. नाशिक संघाने हा सामना 3 विरुद्ध 0 गोल अंतराने खिश्यात घातला. नाशिक संघाने खेळाच्या 4 मिनिटलाच आघाडी घेतली. मनप्रीतसिंघने सुरेख मैदानी गोल केला. त्यानंतर 39 व्या मिनिटाला जगदीप सिंघ आणि 58 व्या मिनिटाला महेंद्र टोपनो याने गोल करून निर्णायक आघाडी मिळवली. पटिआलाचा संघ नाशिक पुढे सपशेलपणे हतबल ठरला.
आजचा तीसरा सामना कस्टम मुंबई आणि सैफई हॉस्टल इटावा संघात खेळला गेला. मुंबई संघाने हा सामना 3 विरुद्ध 2 गोल अंतराने जिंकला. इटावा संघाने सामना गमावला पण चांगल्या खेळाच्या जोरावर प्रेक्षकांची मनें जिंकली. मुंबई तर्फे धमाल कुणाल, यादव धर्मबीर आणि जयेश जाधव यांनी प्रत्येकी एक एक गोल केला. तर इटावा संघातर्फे फहाद खान आणि नीतीश भारद्वाज यानी गोल केले.
कस्टम मुंबई संघाने शेवटी उपांत्य फेरी गाठली. आजच्या शेवटच्या हॉकी सामन्यात सेंट्रल रिजर्व पोलीस दिल्ली आणि एक्सेलेंसी हॉकी अकैडमी पुणे संघा दरम्यान खेळला गेला. दिल्ली पोलिसांनी हा सामना 3 विरुद्ध 1 गोल अंतराने जिंकला. सुरुवाती पासूनच दिल्ली संघाने खेळावर पकड निर्माण केली होती. पुणे संघाने चांगले संघर्ष केले पण त्यांना अनुभव कमी पडले. दिल्ली संघातर्फे दीपक याने पेनल्टी स्ट्रोक मध्ये गोल केला. तर उर्वरित दोन गोल मोहम्मद वसीउल्लाह याने केले. उद्या दुपारी 1 वाजता पहिला उपांत्य सामना होईल अशी माहिती हॉकी कमेटीचे प्रमुख गुरमीत सिंघ नवाब (डिम्पल सिंघ) यांनी दिले.
हॉकीसाठी एसो टर्प किंवा ग्रास ग्राउंड साठी डॉ पसरीचा यांना साकडे ! :
गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ परविंदर सिंघ पसरीचा यांनी आज हॉकी स्पर्धेत उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी दुष्ट दमन क्रीडा व युवक मंडळाचे अध्यक्ष गुरमीतसिंघ नवाब यांनी त्यांचे सत्कार केले. यावेळी त्यांच्या समवेत सल्लागार स. जसबीरसिंघ धाम, गुरुद्वाराचे अधिकारी ठानसिंघ बुंगाई, मोहन सिंघ गाडीवाले, सुखविंदरसिंघ हुंदल, जोगिंदर सिंघ खैरा, डॉ जुझारसिंघ सिलेदार यांची उपस्थिती होती. यावेळी स. रविंद्र सिंघ मोदी यांनी हॉकी खेळाडू आणि हॉकी कमेटीच्या भावना डॉ पसरीचा यांना अवगत करून दिल्या. त्यांनी आपल्या निवेदनात विनंती केली की, खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम मैदानावर हॉकीची एसो टर्प किंवा ग्रास टर्प उपलब्ध करून द्यावी. स. गुरमीतसिंघ नवाब आणि हरविंदरसिंघ कपूर यांनी मैदानावर सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी डॉ पसरीचा यांच्याशी चर्चा केली. रणजीत सिंघ चिरागिया यांनी सुद्धा प्रस्तुत मागणीला प्रोत्साहन दिले.