पत्रकार शेख याहिया यांचा महाराष्ट्र भुषण व जिवन गौरव पुरस्काराने सन्मान
नांदेड – माझा महाराष्ट्र न्युज लाईव्हचे संचालक पत्रकार शेख याहिया यांचा महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्र भुषण व जिवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने दि. 25 डिसेंबर रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात महाराष्ट्र भुषण, नांदेड भुषण, जिवन गौरव, कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात पत्रकार शेख याहिया यांचा बहुजन समाज पार्टीचे नेते मनिष कावळे, जयश्री जयस्वाल, ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, आयोजक मुकुंदराज पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र भुषण व जिवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
पत्रकार शेख याहिया यांना यापुर्वी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यात सत्यशोधक विचार मंचच्या वतीने समाजभुषण, खादमीत ए उम्मदचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार, जयपुर येथे शक्ती फिल्म पोडक्शनच्या अंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच सहारा फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. विविध सामाजिक प्रश्नांना समोर आणून अनेकांना त्यांनी न्याय दिला आहे. शेख याहिया यांना मिळालेले हे पुरस्कार त्यांच्या कामाची पावती असून या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.