राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेतील ठेवी परत करण्याची मागणी
(प्रतिनिधी परळी वैजनाथ) दि. 29 येथील राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून होणारा आर्थिक व्यवहार मागील काही दिवसापासून अनियमित झाला असल्याचे दिसत आहे त्यामुळे ठेवीदारांनी आपल्या ठेवी पतसंस्थेकडून परत मागितल्या असता अनेक वेळा तारखावर तारखा देऊन पतसंस्थेद्वारे ठेवी परत करण्यास टाळाटाळ केली जात आहे त्यामुळे सदरील ठेवी परत मिळण्यासाठी आज ठेवीदाराच्यावतीने मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले व राज्यांमध्ये अशा मल्टीस्टेट पतसंस्थेकडून होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहाकडे लक्ष देऊन ठेवीदारांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेमध्ये ठेवी परत करण्यासाठी खातेधारक गेले असता त्यांना 26 डिसेंबर रोजी वाटप करण्यात येईल असे तोंडी सुचित करण्यात आले परंतु त्यांना ठेवी परत केल्या नाही त्यामुळे सदर ठेवीदारांनी दिनांक 2 जानेवारी रोजी ठेवी परत मिळवण्यासाठी संवैधानिक मार्गाचा वापर करून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे