जिला

आयुष्यमान गोल्डन कार्ड विशेष मोहिमेला प्रतिसाद एकाच दिवसात 21 हजार 714 नोंदी

नांदेड,29- सर्वसामान्यांना वैद्यकिय उपचारासाठी अत्यंत लाभदायी असलेली योजना म्हणून आयुष्यमान भारत योजनेकडे पाहिले जाते. आयुष्यमान गोल्डन कार्ड लाभार्थ्यांकडे असणे या योजनाच्या लाभासाठी आवश्यक आहे. जिल्ह्यातील ज्या लोकांना अजूनही आयुष्यमान गोल्डन कार्ड मिळाले नाही अथवा ज्यांनी अजूनही या कार्डसाठी अर्ज भरले नाहीत अशा व्यक्तींसाठी गुरुवार दिनांक 28 डिसेंबर रोजी संपूर्ण जिल्हाभर विशेष मोहिम हाती घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले होते. या विशेष मोहिमेला जिल्‍हयात चांगला प्रतिसाद मिळाला असून एकाच दिवसी 21 हजार 714 नोंदी करण्‍यात आल्‍या आहेत.

दम्‍यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्‍हयातील विविध गावात सुरु असलेल्‍या आयुष्यमान गोल्डन कार्ड विशेष मोहिमेला आकस्मिक भेटी देवून पाहणी केली. नांदेड तालुक्‍यातील खुरगाव, नांदुसा, पासदगाव आदी गावात त्‍यांनी ग्रामस्‍थांशी संवाद साधला. आयुष्यमान भारत योजना सर्वसामान्यांना वैद्यकिय उपचारासाठी अत्यंत लाभदायी असून गावस्‍तरावरील प्रत्‍येकांनी आयुष्यमान गोल्डन कार्ड काढून या योजनाचा लाभ घेण्‍याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सरपंच संताबाई नारायणराव लेंडाळे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, उप अभियंता वाडीकर, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्‍थ यांची उपस्थिती होती.

 

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देगलूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शेखर देशमुख यांनी करडखेड येथे आयुष्यमान गोल्डन कार्ड नोंदणी मोहिमेत स्‍वत: लाभार्थ्यांच्या नोंदी केल्या.

 

आयुष्यमान गोल्डन कार्ड नोंदीणी मोहिमेत एकाच दिवसी जिल्‍हयात 21 हजार 714 नोंदी झाल्‍या आहेत, आयुष्यमान गोल्डन कार्ड नोंदींख्‍ी तालुका निहाय आकडेवारी याप्रमाणे- अर्धापूर तालुक्‍यात 1 हजार 145, भोकर- 1 हजार 175, बिलोली- 1 हजार 203, देगलूर- 920, धर्माबाद- 288, हदगाव- 1 हजार 695, हिमायतनगर- 428, कंधार- 1 हजार 12, किनवट- 1 हजार 118, लोहा- 1 हजार 985, माहूर- 2 हजार 151, मुदखेड- 690, मुखेड- 2 हजार 916, नायगाव- 2 हजार 114, नांदेड- 1 हजार 787 तर उमरी तालुक्‍यात 653 अशा एकूण 21 हजार 714 नोंदी झाल्‍या आहेत. या माहिमेत जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्‍यामार्गदर्शनात गाव स्‍तरावर आरोग्‍य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, आशा वर्कर आदींनी परिश्रम घेतले.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button