स्पोर्ट्स

कै . गिरजाबाई कदम यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत सैन्य, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

नांदेड. दि.29/ गिरजाई प्रतिष्ठान व रुद्रा डिफेन्स अकॅडमीच्या वतीने स्वर्गीय गिरजाबाई बाबुराव कदम कोंडेकर यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक 7 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 दरम्यान मोफत सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रुद्रा डिफेन्स अकॅडमी एस जी जी एस इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाठीमागे विष्णूपूरी येथे करण्यात आले असून त्याचा शहरासह ग्रामीण भागातील युवक युवतीने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे . मोफत स्वरूपात रुद्रा डिफेन्स अकॅडमी विष्णुपुरी नांदेड येथे होणाऱ्या या शिबिरातील प्रशिक्षणार्थींना टी-शर्ट सकाळचा सकस आहार देण्यात येणार असुन लेखी परीक्षेची तयारी कशी करावी याचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शन केले जाणार आहे .

 

पाच दिवसाचे मोफत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवक युवतींना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे . या मोफत प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन गिरजाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुन्ना कदम कोंडेकर रुद्रा डिफेन्स अकॅडमीचे संचालक डॉ . हंसराज वैद्य , बाबुरावजी खंदारे , श्रीनिवास भुसेवार शिवानंद लिंगायत , प्रा . जगदीश खाडे , शिवाजी पुजरवाड , मालोजी कांबळे , पोतुरी रेड्डी , प्रा अमरदिप घोटी , निलेश खराटे यांनी केले आहे .

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button