जिला

डॉ. राम वाघमारे यांचा गौरव

 

नांदेड,29- महात्मा फुले हायस्कूलचे सहशिक्षक तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणेच्या मराठी भाषा विषयासाठी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल गुरुवार दिनांक 28 डिसेंबर रोजी नांदेड येथील स्वर्गीय गंगाधररावजी पांपटवार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या हस्ते त्‍यांचा यथोचित गौरव करण्यात आला. याप्रसंगी उप शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, उप शिक्षणाधिकारी (योजना) पेठवडजकर मॅडम, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गजानन पांपटवार यांची उपस्थित होती.

स्वर्गीय गंगाधररावजी पांपटवार उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक सहविचार सभेचे आयोजन केले होते. यावेळी संस्‍थेच्‍या वतीने डॉ. राम वाघमारे यांचा शाल, पुष्पहार व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थीतांना शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवदास गायकवाड यांनी तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक शिंदे यांनी मानले. या सहविचार सभेत संस्थेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button