क्राईम

पॅरोल रजेवर आलेला व्यक्तीला पोलिसांनी गोळी झाडून पकडले

मयत

नांदेड(प्रतिनिधी)-तुरुंगात आजीवन कारावास भोगत असलेला एक युवक संचित अथवा पॅरोल रजेवर नांदेडला आला. आला तेंव्हापासून तो इतरांना त्रास देत होता. आज सकाळी त्याने शेजारी राहणाऱ्या हरदिपसिंघ पाठी उर्फ राजू यांच्या कुटुंबावर दगडफेक केली. काही जण सांगतात की त्याने तलवारीने सुध्दा काही जणांवर हल्ला केला. स्थानिक गुन्हा शाखा आणि वजिराबादच्या पथकाने संयुक्तरित्या त्याच्या पायावर गोळीमारून त्याला जेरबंद केले आहे. सध्या जखमी आरोपी उपचार घेत आहे.

आज भगतसिंघ रोडच्या शेजारी घर असलेला शेरसिंघ नानकसिंघ गिल हा युवक पॅरोलवर किंवा संचित रजेवर नांदेडला आलेला व्यक्ती आहे. कारण त्याने बहुतेक दहा-बारा वर्षापूर्वी आपल्या एका नातलगाचा खून केला होता. त्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. तो शिक्षेच्या सुट्टीवर आल्यापासून आसपासच्या लोकांना त्रासच देत होता. आज सकाळी हरदिपकसिंघ पाठी उर्फ राजू यांच्या कुटूंबासोबत काही तरी वाद केला आणि त्यांच्या घरावर दगडफेक केली. या दगडफेकीत हरदिपसिंघ पाठी उर्फ राजू यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

घडलेला प्रकार पोलीसांना माहित झाल्यानंतर अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे, सचिन सोनवणे आणि अनेक महिला व पुरुष पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले. शेरसिंघ गिलने पोलीस आल्यानंतर आपल्या घरातील दोन गॅस सिलेंडर उघडे करून त्याचा गॅस घरात पसरवून टाकला. त्यामुळे कोणत्याही क्षणी तेथे आग लागू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पोलीसांनी कडक पावले उचलत त्याच्याकडे दोन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी त्याच्या पायाला लागली आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे. सध्या आरोपी शेरसिंघ नानाकसिंघ गिल हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button