क्राईम

गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व दोन जिवंत काडतुसासह दोन इसम ताब्यात

 

स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी आज दिनांक 11/12/2023 रोजी सपोनि माने व पोउपनि काळे यांचे टिमला अग्निशस्वा संबंधाने कारवाई करण्याचे आदेश देवून रवाना केले होते.

अग्निशरवा मधील रेकॉर्ड वरील आरोपीस चेक करीत असतांना पोउपनि काळे यांना माहीतो मिळाले की नाळेश्वर येथील आकाश वाघोळे व त्याचे सोबत एकजन विना नंबरचे मोटार सायकलवर फिरत असुन त्यांचे जवळ पिस्टल आहे असी खात्रीशीर माहीती मिळाले वरुन त्यांनी आज रोजी पंचासह नाळेश्वर शिवारात सदर इसमाचा शोध घेत असताना नाळेश्वर ते नांदेड रोडवर त्यांना एका विनानंबरचे मो.सा. यर दोन इसम येत असतांना दिसुन आले सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांची नाव गाव विचारले असता 1. आकाश व्यंकटी वाघोळे वय 25 वर्षे व्यवसाय बेकार रा. नाळेश्वर ता. जि. नांदेड 2. सय्यद वसीम सय्यद काशीम वय 32 वर्षे व्यवसाय बेकार रा. दुलेशाहा रहीमान नगर वाधीरोड नांदेड असे सांगीतले

 

त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता इसम नामे सय्यद वसीम सय्यद काशीम वय 32 वर्ष व्यवसाय बेकार रा. दुलेशाहा रहीमान नगर वाघोरोड नांदेड याचे कमरेला एक अग्निशस्त्र (गावठी कट्टा) व दोन जिवंत काडतुस किमती 27,000/- रुपयाचे अग्निशस्त्र मिळुन आले आकाश व्यंकटी वाघोळे याचे ताब्यातुन एक बजान कंपनीची 220 मॉडेलची विनार्बरची मो.सा. किमती 1,70,000/- मिळून आलो असे एकुण 1,97,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपी विरुध्द पोउपनि श्री रत्तात्रय काळे यांनी पो.स्टे. लिंबगाव येथे फिर्याद दिली आहे.

 

सदरची कार्यवाही ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखालो, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्वागुशा, सपोनि पांडुरंग नाने, पोउपनि / दत्तात्रय काळे, आशोष बोराटे, पोडेफा/गंगाधर कदम, बालाजी तेलंग, अफजल पठाण, पोको / गणेश धुमाळ, विलास कदम, रनधीर राजबन्शो, धम्मा जाधव, गजानन बयनवाड, विठ्ठल शेळके, मोतीराम पवार, बालक पोको/ हनुमान ठाकुर यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button