देश विदेश

नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीला भीषण आग; बसचा जळून कोळसा

नाशिक, 10 डिसेंबर : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. चालत्या एसटी बसनं पेट घेतला आहे. या घटनेत बस जळून खाक झाली आहे. ही घटना घडली तेव्हा बसमध्ये प्रवासी देखील होते, बसला आग लागल्याचं लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन समिती पथकातील सदस्यांनी प्रवाशांना सुरखरूप बाहेर काढलं आहे, या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र बसचं मोठं नुकसान झालं आहे. ज्या शिवशाही बसला आग लागली ती बस नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे निघाली होती.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत बस जळून खाक झाली, सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. चालत्या बसनं अचानक पेट घेतल्यानं बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला, स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पथकातील सदस्यांनी या बसमधून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. निफाड तालुक्यातील चांदोरी जवळ ही घटना घडली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button