नांदेड रेल्वे विभागातून केरळ येथील कोट्टायम करिता विशेष गाड्या
दक्षिण मध्य रेल्वे ने केरळ येथील सबरीमला जत्रेला होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून नांदेड विभागातून नांदेड आणि आदिलाबाद येथून केरळ राज्यातील कोट्टायम करिता विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे –
1. गाडी क्रमांक 07163 नांदेड- कोट्टायम विशेष गाडी :
गाडी संख्या 07163 हि विशेष नांदेड येथून दिनांक 08 जानेवारी 2024 ला सोमवारी सकाळी 08.50 वाजता सुटेल आणि निजामाबाद, करीमनगर, विजयवाडा, रेणीगुंठा, कोईमबतोर, एरणाकुलम मार्गे कोट्टायम येथे मंगळवारी रात्री 22.05 वाजता पोहोचेल.
2. गाडी क्रमांक 07164 कोट्टायम – सिकांदारबाद विशेष गाडी :
गाडी संख्या 07164 हि विशेष गाडी कोट्टायम येथून दिनांक 10 जानेवारी 2024 ला रात्री 00.30 वाजता बुधवारी सुटेल आणि एरणाकुलम, कोईमबतोर, रेणीगुंठा, विजयवाडा मार्गाने सिकंदराबाद येथे गुरुवारी सकाळी 05.00 वाजता पोहोचेल.
3. गाडी क्रमांक 07161 आदिलाबाद – कोट्टायम विशेष गाडी :
गाडी संख्या 07162 हि विशेष आदिलाबाद येथून दिनांक 25 डिसेंबर 2023 आणि दिनांक 01 जानेवारी, 2024 ला सोमवारी सकाळी 05.00 वाजता सुटेल आणि किनवट, धानोरा, सहस्तरकुंड, हिमायत नगर, हादगाव रोड, भोकर, बिंबरी, मुदखेड, निझामाबाद, करीमनगर, वरंगल, विजयवाडा, रेणीगुंठा, एर्नाकुलम मार्गे कोट्टायम येथे मंगळवारी रात्री 22.05 वाजता पोहोचेल.
4. गाडी क्रमांक 07162 कोट्टायम-सिकंदराबाद विशेष गाडी :
गाडी संख्या 07162 हि विशेष गाडी कोट्टायम येथून दिनांक 27 डिसेंबर 2023 आणि दिनांक 03 जानेवारी, 2024 ला बुधवारी रात्री 00.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच सिकांदारबाद येथे गुरुवारी सकाळी 05.00 पोहोचेल.
आदरणीय संपादक महोदयांना विनंती आहे हि बातमी आपल्या प्रतिष्ठित वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी.
जनसंपर्क कार्यालय, नांदेड