क्राईम
शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगीरी चोरटीया कडून ५ मोटर सायकल, ८३ ग्रॅम सोने, ८ मोबाईल, ७,७०,०००/- रूपयाचा मुददेमाल जप्त
मा.पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब, व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांनी नांदेड शहरामध्ये सतत चैन स्नॅचिंग चे घटनेसंबधाने शहरातील गुन्हे शोध पथकाची बैठक आयोजीत करून तात्काळ गुन्हे उघडकिस आणण्याचे आदेशीत केले होते.
सदरील आदेशावरून उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री चंद्रसेन देशमुख, उप विभाग नांदेड शहर व पोलीस निरीक्षक श्री डॉ. नितीन काशिकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा तपास चालू असतांना दिनांक २२/१२/२०२२ रोजी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चैन स्नॅचिंग गुन्हयातील संशयीताची गोपनिय माहितीघेवुनसापळा लावुन रोहन अंबादास गायकवाड वय २६ वर्ष रा. विष्णुनगर नांदेड, व एक विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे १. सखोल विचारपुस केली असता त्यांनी नांदेड शहरामध्ये वेगवेळया ठिकाणी सोनसाखळी जबरीने हिसकावुन चोरी केल्याचे कबुल केल्याने त्यांचेकडुन एकुण ८३ ग्रॅम सोन्याचे दागीने असा एकुण ३,८२,०००/- रू ( तिन लाख व्यायंशी हजार रूपयाचे )व वेगवेगळया ठिकाणावरून चोरलेल्या स्पलेंडर ४ व एक पल्सर असे एकुण पाच मोटार सायकल ज्याची किमंत अं. २,३२,००० /- (दोन लाख बत्तीस हजार रूपयाचे )तसेच वेगवेगळया ठिकाणावरून चोरलेले एकुण ०८ मोबाईल कि.अं. १,५६,००० /- (एक लाख छप्पन हजार रूपयाचे) असा एकुण ७,७०,०००/- रू ( सात लाख सत्तर हजार रूपयाचा) मुददेमाल जप्त करून खालील गुन्हे उघडकिस आणुन उत्कृष्ट कामगीरी केली आहे.
१. पो.स्टे शिवाजीनगर गु.र.न ३९६ / २०२२ कलम ३९२, ३४ भादवि (चैन स्नॅचिंग ३ तोळे)
२. पो.स्टे नदिड ग्रा. गु.र.न ५६४ / २२ कलम ३९२, ३४ भादंवि (चैन स्नॅचिंग ३२ ग्रॅम )
३. पो.स्टे शिवाजीनगर गु.र.न ३४१ / २२ कलम ३७९ भादवि (मोटार सायकल चोरी )
४. पो.स्टे आखाडा बाळापुर जि. हिंगोली येथील गुन्हयातील एक मो.सा.
उर्वरीत जप्त करण्यात आलेल्या मुददेमाल संबधाने आणखीन गुन्हे उघडकिस आणण्याची प्रक्रिया चालु आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक नांदेड, मा.श्री श्रीकृष्ण कोकाटे मा. अपर पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, भोकर डॉ. श्री खंडेराव धरणे व उप विभागीय पोलीस अधिकारी मा. श्री चंद्रसेन देशमुख पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील स.पो.नि. आर. व्ही वाहुळे, पोलीस उप निरीक्षक मिलींद सोनकांबळे, व अमलदार शेख इब्राहीम, दिलीप राठोड, रविशंकर बामणे, देविसिंग सिंगल, शेख अझहरोददीन, दत्ता वडजे, विष्णु डफडे यांनी पार पाडली.