क्राईम

पोलिसांत नोकरी लावून देतो’, खोटी कागदपत्रे खरी असल्याचे भासवून…

अकोला : पोलीस दलात नोकरी लावून देण्याच्या नावावर तीन जणांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस विभागात व सैन्य दलात नोकरी लावून देण्याच्या नावावर आरोपीने अनेकांची फसवणूक केली. होमगार्डमध्ये कार्य करणाऱ्या एकाला आरोपीने महाराष्ट्र पोलीस खात्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले.

नियुक्तीची खोटी कागदपत्रे खरे असल्याचे भासवून नोकरी करीता वारंवार नगदी व ऑनलाइनद्वारे एकूण १८ लाख रुपये घेतले. या शिवाय आणखी गावातील एका तक्रारदाराच्या मुलीला पोलीस खात्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही २० लाख ४२ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. आणखी एकाच्या तक्रारीनुसार एका युवकाला सैन्य दलात नोकरी लावून देण्याच्या नावावर त्याच्याकडून एकूण १५ लाख रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या तिघांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली.

या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशी अहवाल तयार करून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात ५३ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button