मराठवाडा

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर मोठी तिकीट तपासणी मोहीम, 4.36 लाख रुपये दंड वसूल केला

दिनांक 08.11.2023 रोजी श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांच्या देखरेखीखाली सकाळी 06.00 ते रात्री 21.00 वाजेपर्यंत औरंगाबाद रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवासी गाड्यांचा तपास करण्याकरिता एक विशेष तिकीट तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली होती.

यात औरंगाबाद रेल्वे स्थानकावर येणाऱ्या 18 रेल्वे गाड्या तपासण्यात आल्या. या तपासणी मोहिमेत श्री नागेंद्र प्रसाद, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड यांच्या सह 36 तिकीट तपासनिसांनी आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या 05 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. दिनांक 08 नोव्हेंबर या एकाच दिवशी या तिकीट तपासणी मोहिमेत 608 विना तिकीट प्रवासी, 111 अनियमित तिकीट प्रवासी आणि 16 अनबुकड लगेज मिळून एकूण 735 केसेस बनविण्यात आल्या आणि 4,36,000/- रुपये दंड वसूल करण्यात आला.

श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी प्रवाशांना आवाहन केले आहे कि प्रवाशांनी योग्य तिकीट घेवूनच प्रवास करावा, अनधिकृत फेरी वाल्यांकडून कोणतेही पदार्थ घेवू नयेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button