दरोडा आणि विनयभंग प्रकरणातील एका आरोपीला महिला पोलिसांनी सिनेस्टाइलने पाठलाग करून पकडले
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे बळीराम तांडा येथे दि.07/10/2023 रोजी गावातील तिघांनी इतर 10 ते 12 जणांना सोबत घेऊन फिर्यादी महिलेच्या घरात घुसून दरोडा टाकून विनयभंग करीत सोन्या चांदीचे दागीने व नगदी रक्कम असा एकुन 2.5 लाखाचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी पीडित महिला सौ. आडे, वय 21 वर्षे, व्यवसाय घरकाम, रा. बळीराम तांडा ता. हिमायतनगर जि.नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हिमायतनगर पोलिस ठाण्यात गावातील तिघांसह 10 ते 12 जणांवर गु.र.न. 204/2023 कलम 307,452,327,354,143, 147, 148, 149, 427,504,506 भा.द. वी. अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हापासून यातील आरोपी फरार झाले आहेत, एक आरोपी विदर्भात असलयःची माहिती मिळाल्यानंतर हिमायतनगर येथील महिला पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला सिनेस्टाइलने पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. न्यायालयात हजार केले असताना एक दिवसाची पोलीस कोठडी त्यानंतर न्यायालयात रवानगी केली आहे. महिला पोलिसांच्या या धाडसी कार्यवाहीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
याबाबत हिमायतनगर पोलिसांनी दिलेली अधिकृत माहिती अशी कि, दि.07/10/2023 रोजी दुपारी अंदाजे 13:00 वाजताचे सुमारास हिमायतनगर तालुक्यातील मौजे बळीराम तांडा येथील फिर्यादी महिलेच्या घरी व घरासमोर तसेच साक्षीदार यांचे दुकाणामध्ये आरोपी सुजीत मधुकर राठोड, विशाल मधुकर राठोड, मधुकर वंसत जाधव तीघे राहणार बळीराम तांडा यांनी सोनु चव्हाण रा. मुदखेड तांडा, लखन रामदास चव्हाण रा. जाभंळी तांडा व ईतर 10 ते 12 जण गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी महिलेच्या घरी येवून घरात घुसून फिर्यादीची सासु सावित्राबाई हीस शिवीगाळ केली होती.
तसेच जीवे मारण्याचे उद्येशाने लोखंडी रॉडने तसेच हातातील पंचने डोक्यावर, दंडावर, पाठीवर, नाकावर जबर मारहाण करुन जखमी केली. एव्हडेच नव्हेतर फिर्यादीचे सासुचे गळ्यातील सोन्याचे गंठन व कपाटातील ठेवलेले फिर्यादीचे सोन्याचे दागीने नगदी रक्कम असा एकुण 2,50000/-रुपयाचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला. आणि फिर्यादीची साडी ओढुन तिचा विनयभंग करून घरासमोर ठेवलेली फिर्यादीचे दिराची मोटार सायकल क्रमांक एम.एच-26- बी. वाय- 0038 वर लोखंडी रॉडने मडगार्डवर मारुन, पेट्रोलची टाकी फोडून नुकसान केले होते.
तसेच चुलत सासरे यांचे दुकानातील सामान फेकुन देवुन अंदाजे 46000/- रुपयाचे नुकसान केले. अशी तक्रार पीडित महिलेणे दिल्यावरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात जबरी दरोडा व विनयभंग केल्याचा गुन्हा आरोपी: 01) सुजीत मधुकर राठोड, 02) विशाल मधुकर राठोड 03) मधुकर वंसत जाधव तीघे राहणार बळीराम तांडा तसेच 04) सोनु चव्हाण रा. मुदखेड तांडा 05) लखन रामदास चव्हाण रा. जाभंळी तांडा व ईतर 10 ते 12 जनावर कलम 307,452,327,354,143, 147, 148, 149, 427,504,506 भा.द. वी. अनुसार दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच यातील सर्वच आरोपी फरार झाले असून, या घटनेचा पूढील तपास महीला पोउपनि जाधव मँडम यांचेकडे देण्यात आला आहे.
तेंव्हापासून फफर आरोपीचा शोध पोलीस निरीक्षक बिडी भुसनर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस करत होते. नुकतेच विदर्भातील दराटी पोलिस ठाण्यातील हद्दीत भवानी तांडा येथे यातील एक आरोपी आला असल्याची गुप्त माहिती खबरीमार्फत मिळाली होती. त्यास पकडण्यासाठी हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी डी भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोमल कागणे, पोहेको शंकर जाधव हि टीम रवाना झाली. पोलिसांची टीम आल्याचे समजताच आरोपी विलास मधुकरराव राठोड वय 27 वर्ष याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आरोपी पोलिसांना पाहून पळून जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून दि. 25 रोजी रात्री 10.21 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे.
सदरील आरोपीला हिमायतनगर पोलिसांनी दि 26 रोजी न्यायालयात हजार केले असता न्यायाधीश महोदयांनी त्यास एक दिवसाची पोलीस कस्टडीत पाठवले होते. त्यानंतर आज 27 रोजी न्यायालयात हजर केली असतांना न्यायाधीश महोदयांनी आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेतील 12 ते 14 आरोपी फरार असून, त्या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. महिला पोलिसांनी एका आरोपीला विदर्भातून अटक करून आणल्याबद्दल त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातुन अभिनंदन व कौतुक केले जाते आहे.