हेल्थ
नांदेड पोलीस दल व सरदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हैद्राबाद, यांच्या संयुक्त विद्यमाने पाच किमी गॅरेथॉनचे आयोजन…..
सरदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी (एस.वाय.पी.एन.पी.ए) हैद्राबाद, चे 75 वर्षे पुर्ती निमीत्त पोलीस दलातील सदस्य व त्याच्या कुटूंबीया करीता फिट राईज 75 दिवसीय फिटनेस प्रोग्राम आयेजित करून प्रत्येक पोलीस दलातील सदस्याने त्यांचे कुटूंबीय व नागरीक यांनी नियीमत व सातत्यपुर्ण पाच किमी अंतर सहज धावणे हे उदीष्ट साध्य करण्यासाठी स्वताचे शारिरीक क्षमता विकसीत करण्यासाठी सदर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.
सदर मॅरेथॉन सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अॅकॅडमी हैद्राबाद व नांदेड पोलीस दल संयुक्तीकरित्या दिनांक 27.10.2023 रोजी 09.30 वाजता पाच किमी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. सदर मॅरेथॉन मध्ये मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, श्री सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर श्रीमती डॉ. अश्विनी जगताप मॅडम, पोलीस उप अधिक्षक (म्) नांदेड तसेच शहरतील अधिकारी, अंमलदार व त्यांचे कुटूंबीय, शहरातील विवीध महाविद्यालयातील तरूण, पोलीस प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी असे एकुण 560 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यामधुन प्रथम क्रमांक रविंद्र राजु घोडके, (17.28.63) द्वितीय- संतोष विठठल उतरवाड (18.02.16). तृतीय- रवी शेषेराव पवार ( 18.29.55) यांनी क्रमांक पटकावला आहे.
सदर मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली मा श्रीमती डॉ. अश्विनी जगताप मॅडम, पोलीस उप अधिक्षक (मु), मा. श्री विजय धोंडगे, राखीव पोलीस निरीक्षक पो. मु. पोउपनि गणपत पप्पुलवार योगेश बोधगिरे, साईनाथ पुयड, क्यु आर.टी, नांदेड, व त्यांचे अंमलदार यांनी परिश्रम घेतले.