स्पोर्ट्स

राज्य शालेय धनुर्विद्या स्पर्धेत सार्थ तमलुरकरचा डबल सुवर्ण धमाका..

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय अमरावती यांच्यावतीने 21 व 22 ऑक्टोबर दरम्यान विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे आयोजित राज्यस्तर शालेय धनुर्विद्या स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात रिकर्व प्रकारात 60 मीटर वर सर्वाधिक 323 तर 50 मीटरवर 333 सर्वाधिक स्कोर करीत दोन्ही अंतरावरील सुवर्णपदक मिळवून सार्थ तमलूरकरणे कुटुंबीयास नांदेडकरांना दसऱ्याची सुवर्ण भेटच दिली आहे . तर सार्थ तमलूरकर सह अजय राठोड अमित वायफळकर व पृथ्वीराज कदम यांच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी करत कास्यपदक मिळविले , 17 वर्ष वयोगटात नांदेडच्या ज्ञानेश बालाजी चेरले ने दोन कास्यपदक मिळवीत सार्थ सह राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी निवड कायम केली आहे .

 

 

 

नांदेडच्या टीमला राष्ट्रीय प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले . तर ज्ञानेश चेरलेला बालाजी चेरले यांचे मार्गदर्शन लाभले .राज्यस्तर सुवर्णपदक विजेत्या व कांस्यपदक विजेत्या सार्थ तमलुरकर सह प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड ,अमित वायफनकर , पृथ्वीराज कदम व अजय राठोड चा सन्मान राष्ट्रीय खेळाडू तथा उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधिकारी नंदकिशोर घोगरे यांच्या हस्ते जिल्हा संघटनेचे कोषाध्यक्ष सुरेश तमलुरकर ,बालाजी पाटील जोगदंड ,ज्ञानोबा नागरगोजे ,उपाध्यक्ष अभिजीत मुन्ना कदम राजेंद्र सुगावकर , मालोजी कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडला .त्यांच्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत डॉ . हंसराज वैद्य क्रीडा अधिकारी चंद्र प्रकाश होनवडजकर ,अध्यक्ष श्रीनिवास भुसेवार बालाजी शिरशीकर संजय बेतिवार संघटना सदस्य संजय चव्हाण संतोष कनकावार ,क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर ,सतीश पाटील जाधव ,नरवाडे सर प्रेम जाधव , बाबू गंदपवाड प्राचार्य मनोहर सूर्यवंशी यांच्यासह यांच्या आई व वडिलांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button