जिला
भोकर उपविभागीय अधिकारीपदी सचिन यादव रुजू
(अनंतोजी कलिदास)
भोकर : गेल्या १४ महिन्यांपासून भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा पदभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे होता.दि.१३ ऑक्टोंबर रोजी राज्य प्रशासनाच्या आदेशाने सदरील कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी म्हणून सचिन यादव यांची पदोन्नतीने नियुक्ती केली होती.हा पदभार प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अनुपसिंह हे पाहत होते.दि.२५ ऑक्टोंबर रोजी त्यांच्याकडून उपविभागीय अधिकारी पदाच्या पदभार सचिन यादव यांनी स्विकारला असून ते याठिकाणी रुजू झाले आहेत.
भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे प्रथम उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या तत्पर व कर्तव्यदक्ष कर्तव्याची नोंद घेऊन माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोकराव चव्हाण यांनी राजेंद्र खंदारे यांना दुसऱ्यांदा भोकर उपविभागीय अधिकारी म्हणून सेवा बजावण्याचे संधी राज्य प्रशासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली होती.त्यांचा येथील शासकीय सेवेचा कार्यकाळ पुर्णत्वास आल्याने व महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यामुळे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या राजेंद्र खंदारे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयीन कार्यालयात मुंबई येथे अवर सचिव म्हणून त्यांची बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीनंतर सदरील कार्यालयाचा पदभार प्रभारी अधिकारी म्हणून कधी भोकर चे तहसिलदार राजेश लांडगे यांच्याकडे तर कधी मुदखेड चे तहसिलदार सुजित नरहरे यांच्याकडे देण्यात आला.दरम्यानच्या काळात प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अनुपसिंह यादव यांच्याकडे हा पदभार देण्यात आला होता.प्र. उपविभागीय अधिकारी अनुपसिंह यादव हे प्रशिक्षणार्थी अधिकारी असल्याने त्यांच्या जागेवर कायमस्वरूपी अधिकारी द्यावा म्हणून राज्य प्रशासनाने दि.१३ ऑक्टोंबर २०२३ रोजी सचिन यादव यांची पदोन्नतीने नियुक्ती केली.
नागपूर विभागातील वर्धा येथे तहसिलदार पदी नियुक्ती असलेल्या सचिन यादव यांची भोकर उपविभागीय अधिकारीपदी पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली.दि. २५ ऑक्टोंबर २०२३ रोजी प्र.उपविभागीय अधिकारी अनुपसिंह यादव यांच्याकडून सचिन यादव यांनी उपविभागीय अधिकारी पदाचा पदभार स्विकारला असून ते याठिकाणी रुजू झाले आहेत.प्र.उपविभागीय अधिकारी म्हणून अनुपसिंह यादव यांनी मिळालेल्या अल्पावधी कार्यकाळात देखील येथील प्रशासकीय सेवा उत्तमरित्या बजावली आहे.तर आता कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी म्हणून सचिन यादव यांनी पदभार स्विकारल्यामुळे खोळंबलेली कामे त्यांच्याकडून जलदगतीने व्हावित अशी अपेक्षा उपविभागीय अधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रातील तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त होत.भोकर उपविभागीय अधिकारीपदी सचिन यादव हे रुजू झाले असल्याने उपविभागीय अधिकारी कार्यालय व भोकर तहसिल कार्यालयातील अनेक अधिकारी,कर्मचारी व यांसह आदी प्रतिष्ठीत नागरिकांनी त्यांचे यथोचित स्वागत करुन पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा देणाऱ्यांत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकरचा ही समावेश असून मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे,तालुकाध्यक्ष बालाजी नार्लेवाड,तालुका कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे,तालुका उपाध्यक्ष विजयकुमार चिंतावार,कमलाकर बरकमकर, सहसचिव विठ्ठल सुरलेकर,कोषाध्यक्ष बालाजी कदम पाटील,सदस्य रमाकांत जोशी,विनय दुर्केवार यांसह आदींनी स्वागत करुन पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.