क्राईम

हिमायतनगर पोलिसाची दमदार कार्यवाही दुचाकी व बॅटरी चोरास केली अटक  सहा दुचाक्या व दोन बॅटऱ्यासह मुद्देमाल जप्त

नांदेड (हिमायतनगर)  हिमायतनगर शहरासह तालुक्यात मागील दोन-तीन वर्षांपूर्वी पासून दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. तसेच बॅटरींची चोरकरण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारावर आळा घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षकाकडून मिळाल्यानंतर हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी डी भुसनुर यांनी जमादार अशोक सिंगनवार व त्यांच्या टीमला चोरट्याच्या तपास कामी रवाना केले होते. हिमायतनगर पोलीस टीमने ट्रॅक्टरच्या बॅटरी चोर व दुचाकी चोरास मुद्देमालासह अटक केली आहे. हिमायतनगर पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे शहरातील नागरिकातुन पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.
Ipc 379 अंतर्गत हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रारकरते प्रवीण गंगाधर मामिडवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल असलेल्या गुन्ह्याचा मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तपास करून जमादार अशोक सिंगणवाड, पोलीस नाईक नागरगोजे यांनी आरोपी गोपाल रामराव बाटाने वय 27 वर्षे राहणार कोपरावय 27 वर्ष तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यास दिनांक 17 डिसेंबर रोजी अटक केली आहे. न्यायालयाने दिलेल्या पीसीआर मध्ये चौकशी केली असता मामीडवार यांच्या येथे भाड्याने राहणारे मंगलेश चौधरी, राजस्थान यांच्या ट्रॅक्टरच्या दोन बॅटरी अंदाजे 9000 किमतीच्या आरोपीने चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून दोन बॅटरी जप्त करण्यात आले आहेत.
तसेच आत्ताउल्ला खान, यांच्या तक्रारीवरून दाखल असलेल्या  लकडोबा चौकातील सार्वजनिक रोडवरून चोरीला गेलेल्या मोटार सायकल चोराचा तपास कामी रवानगीत असलेले जमादार अशोक सिंगणवाड, पोलीस नाईक नागरगोजे यांनी अब्दुल रहेमान शेख चांदपाशा यास ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावेळी त्याने शेख अबुजर शेख मुसा वय 19 वर्ष यास सोबत घेऊन दोघांनी दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून शेख अबुजर शेख मुसा यास दि15 रोजी अटक केली होती. त्यास न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. या काळात चौकशी केली दोघांनी मिळून 6 मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. त्यात 2 स्प्लेन्डेर गाडी, 2 युनिकॉन, 1 बुलेट,1शाईन अश्या सहा गाड्या असा एकूण 4 लाखाचा मुद्देमाल जप्त केल्या आहेत. सदर आरोपीनी आणखी दुचाक्या चोरल्या असल्याची शंका असल्याने त्या दिशेने तपास सुरू आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अफकत आमना, पोलीस निरीक्षक बी डी भुसानुर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. ही माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक, बालाजी महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, पोलीस नाईक आऊलवाड, पोलीस शिपाई जिंकलवाड, कुलकर्णी आदींसह हिमायतनगर पोलिस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे शहरातील नागरिकांतुन अभिनंदन केले जात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button