मराठवाडा

तलाठी पदाच्या भरतीसाठी असलेली खुला व राखीव वर्गाची परीक्षा शुल्क कमी करा – मंगेश कदम

 

नांदेड / राज्यातील सहा विभागा अंतर्गत 36 जिल्ह्यातील तलाठी पदाच्या भरतीसाठी खुला व राखीव वर्गासाठी परीक्षा शुल्क हे जास्त असल्याने ती गोरगरीब,मजूरदार,बेरोजगार व् मध्यमवर्गियाना परवडणारी नसल्याने हे शुल्क तात्काळ कमी करावे अशी मागणी काँग्रेस अनु.जाती विभागाचे नांदेड शहरअध्यक्ष जिल्हाध्यक्ष मंगेश कदम यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागा अंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यातील तलाठी(गट- क) संवर्गातील एकूण 4 हजार 644 पदाच्या भरतीची जाहिरात शासनाच्या सकेंतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी पदाच्या सरळ सेवा भरती करिता दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहे.त्या करिता तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज 26 जुन 2023 पासून सुरु होत आहे. यासाठी खुल्या गटासाठी 1000 रुपये तर राखीव गटासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क आकरण्यात येत आहे.

 

व अर्ज भरण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन असल्याने ही बाब खर्चिक असल्याचे कदम यांनी म्हण्टले आहे. गोरगरीब, मजुरदार,मध्यमवर्गीय व् बेरोजगार कुटुंबातील विद्यार्थ्यासाठी हे शुल्क जास्त आहे. कांही खुल्या व राखीव गटातील विद्यार्थ्यांचे आई वडील मोलमुजुरी करतात तर काही मिस्त्री काम करतात व कांही जन हाताला भेटेल ते काम करतात.त्यांना दिवसकाठी 400 ते 500 रुपये मजुरी मिळते.ते हे शुक्ल व इतर खर्च ते कसे करू शकतात..?असा सवाल मंगेश कदम यांनी केला आहे. त्यामुळे खुल्या व राखीव गटातील परीक्षा शुल्क कमी करण्यात यावेत..जेणे करून गोरगरीब,मजुरदार व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतील शासनाने गांभीर्याने दखल घेऊन खुला वर्गासाठी 1000 व राखीव गटासाठी 900 रुपये असलेले परीक्षा शुल्क कमी करून गोरगरिबांना न्याय द्यावा अशी मागणी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मंगेश कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button