जिला

शासन आपले दारी, नांदेड जिल्ह्यातील वन कामगार शासनाचे दारी

 

 

 

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील माहुर, किनवट, मांडवी, बोधडी, हदगांव, भोकर, नांदेड, देगलूर आदी वन परिक्षेत्रातील कामगाराचे एप्रिल – 2020 पासून वेतन थकीत आहे. 2021 पासून कामगार थकीत वेतन मिळावे म्हणून वन परिक्षेत्र किनवट व माहूर येथीलकामगार परिक्षेत्र अधिकारी यांचेकडे सतत मागणी करून, कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत असताना “कोव्हीड-19 या महामारीच्या काळात आंदोलन केल्यास कार्यवाही करण्यात येईल असे सांगून शासनाकडून निधी उपलब्ध होताच वेतन देण्यात येईल असे सांगून वेळ प्रसंगी कामगारांना पगारापोटी कामगारांचे मागणी केल्याप्रमाणे कांही रक्कम कामगारांचे बँक खात्यात जमा केली. पगार आज न उद्दा मिळेल या आशेवर काम करीत आहे.” कोव्हीड-19 महामारी संपली शासनाकडून निधीही मिळाला परंतु कामगारांचे एप्रिल-2020 पासून थकीत वेतन दिले नाही. वेतन मिळावे म्हणून जिल्ह्याचे वन विभाग प्रमुख मा. उपवनसंरक्षक यांचेकडे निवेदन देऊनही दखल घेतली गेली नाही. म्हणून नांदेड येथे आंदोलन करत असल्याची नोटीस मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने दिल्यानंतर थकीत वेतनाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून किनवट परीक्षेत्राचे वन परीक्षेत्र अधिकारी यांची चौकशी अधिकारीम्हणून नियुक्ती केली.

 

चौकशी अधिकारी यांनी किनवट व माहूर परीक्षेत्रातील थकीत पगार असणाऱ्या कामगारांना कार्यालयास बोलावून प्रत्येक कामगारांचे जबाब नोंदवून घेतले. दिनांक 23/05/2021 रोजी कामगारांचे जबाब नोंदवून घेऊन तसा अहवाल मे. सहाय्यक वन संरक्षक (जंकाब व कॅम्प) किनवट यांना सादर केले असे चौकशी अधिकारी किनवट यांनी दिनांक 15/08/2022 चे पत्राद्वारे कामगारांना लेखी कळवले. सदर पत्रातच असेही कळवतात की वन खात्याचे वनपाल व वनरक्षक यांना चौकशीचे कामी हजर रहाण्यास कळवूनही ते हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे चौकशी पूर्ण झालेली नाही, 15 ते 20 दिवसात चौकशीपूर्ण करून अहवाल सादर करण्यात येईल. परंतु आज 15/08/2023 ही जवळ आला अद्याप अहवाल मा.उपवनसंरक्षक वन विभाग नांदेड हे 2021 पासून मागत आहेत अद्याप अहवाल त्यांनामिळालेला नाही. माहे एप्रिल-2020 पासूनचा पगार अद्याप थकीत आहे. वन कामगारा करिता शासनाने किमान वेतन कायदाप्रमाणे किमान वेतन जाहीर केलेले आहे. किमान वेतन मा. उपवनसंरक्षक यांनी ही किमान वेतनाची अंमलबजावणी करावी म्हणून माहे जानेवारी व जुलै दर सहा महिण्यात बदलणारे महागाई भत्याप्रमाणे रोजंदारी दर जाहीर केलेले आहेत.

 

परंतु कामगारांना जाहीर केलेले किमान वेतन जानेवारी 2023 ते जून 2023 करिता आदिवासी व डोंगराळ भाग म्हणून किनवट, माहूर, मांडवी, इस्लापूर, बोधडी, अप्पाराव पेठ या भागाकरिता प्रति दिवस रु. 457.65 व भोकर, हदगांव, नांदेड, देगलूर, मुखेड या भागाकरिता रु. 438.42 प्रतिदिन रोजंदारीत वेतन देय आहे. परंतु कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार न देता रु. 180/- स्त्री कामगारांना पुरुष कामगारांना रु. 200/- प्रतिदिन या प्रमाणे दिल्या जात आहे. कामगारांना कार्ड व पगाराची पावती द्यावी म्हणून कामगार गेली अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत. परंतु कामगारांना हजेरी कार्ड न देऊन व पगाराची पावती न देऊन त्यांचे वेतनात गोंधळ निर्माण करून जवळपास प्रत्येक कामगारांना त्यांचे किमान वेतनातील अर्धेही वेतन कामगारांना मिळत नाही. कामगारांना हजेरी कार्ड न दिल्यामुळे कामगारांनी महिण्याचे 30 दिवस काम करूनही त्यांना वेतन मात्र अधिकाऱ्याचे मर्जीवर दिले जाते.

 

कामगारांचे एप्रिल – 2020 पासूनचे थकीत वेतन मिळावे, हजेरी कार्ड व वेतन स्लीप मिळावी मा. औद्योगिक न्यायालयाचे आदेशाची अंमलबजावणी करावी म्हणून कामगारांनी दि. 05/06/2023 पासून याच मागणीसाठी हे 3 आंदोलन सुरु केले आहे.

दि. 05.06.2023 पासून आज 19 दिवस संपूनही कामगारांचे न्याय मागणी एप्रिल – 2020 पासूनचे थकीत वेतन मिळावे, हजेरी कार्ड व वेतन स्लीप देण्यात यावी म्हणून शासनाचे दारासमोर 20 दिवसापासून 150 स्त्री, पुरुष कामगार रात्रंदिवस ऊन, पाऊस याची तमा बाळगता बेमुदत धरणे आंदोलन शासनाचे दारात करत आहेत.

हे आंदोलन श्री कॉ. बी.के. पांचाळ सरचिटणीस मराठवाडा सर्व श्रमिक संघटना, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

आंदोलनकर्ते भोजुराम जाधव, दयानंद कोंडिबा कांबळे, माधव उमाजी मेकाले, अशोक लक्ष्मण कांबळे, आनंद किशन मडावी, शालुबाई प्रल्हाद काळे, नर्मदाबाई आनंद किनाके, शंकुतलाबाई निवृत्ती मगरे, शिवाजी खिल्लारे, अशोक वाघमारे आदी 150 कामगार बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button