जिला
नांदेड शहरातील गुन्हेगारावर आळा बसविण्यासाठी प्रभाविणे नाईटगस्त पेट्रोलींग
नांदेड शहरातील गुन्हेगारावर आळा बसविण्यासाठी प्रभाविणे नाईटगस्त पेट्रोलींग करण्याच्या सुचना मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री. आबीनेश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांनी मा. श्री सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर यांना व शहरातील पोस्टेचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने मा. श्री सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर व संबधीत पोस्टेचे पोलीस निरीक्षक व यांनी आपले अंमलदारा सोबत दिनांक 12.06.2023 रोजी चे 11.00 वाजल्या पासुन ते दिनांक 13.062023 चे 04.00 वाजे पर्यंत शहरातील सुपूर्ण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाई पेट्रोलींग केली.
रात्री 11.00 वा. मा. श्री सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर हे विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीत जावुन पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे, डि ओ अधिकारी त्यांचे डी बी पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार, आरसीपीचे अंमलदार यांच्या सोबत डिव्हीजन डि बी चे अंमलदार यांना सोबत घेवुन पाई पेट्रोलींग व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत असताना पोस्टे विमानतळ गुरन 191 / 2023 कलम 143, 149, 435, 511, 336, 427, 506 भादवि व 4 / 25 भाहका मधील आरोपी नामे शेख मुस्ताक शेख वसीम, वय 25 वर्षे, रा. गोविंदनगर नांदेड यास ताब्यात घेवुन त्याचेवर कायदेशिर कारवाई करण्यात आली.
पोस्टे भाग्यनगर चे नाईट डि ओ अधिकारी यांच्या सोबत पाई पेट्रोलींग व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले विनाकारण भटकणाऱ्या 1 व्यक्तीवर कलम 110 / 117 म पो का कायदा प्रमाणे कार्यवाही करण्यात आली. पोस्टे शिवाजीनगरचे पोनि श्री मोहन भोसले, हे व नाईट डि ओ अधिकारी यांच्या सोबत पाई पेट्रोलींग व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले विनाकारण भटकणाऱ्या 3 व्यक्तीवर कलम 110/117 म. पो. का. कायदा प्रमाणे कार्यवाहया
करण्यात आल्या. पोस्टे वजिराबाद हद्दीत मा. श्री गुरव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर व मा. श्री जगदीश भंडरवार, पोनि श्री प्रविण आगलावे, पोस्टे वजिराबादचे 10 पोलीस अंमलदार याच्या सोबत पाई पेट्रोलींग करून रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले चेकींग दरम्यान सोमेश मदनसींग बिडला हा त्याच्या जवळ खंजर बाळगुन असलेला मिळन आला त्यांच्या विरुध्द भाहका 4/25 प्रमाणे कार्यवाही केली. तसेच विनाकारण भटकणाऱ्या 24 व्यक्तीवर कलम 110/117 म पो का कायदा प्रमाणे कार्यवाहया करण्यात आल्या.
पोस्टे इतवारा हद्दीत मा. श्री गुरव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर व पोनि मा. श्री ज्ञानोबा देवकत्ते, व नाईट डि ओ अधिकारी व अंमलदार असे पाई पेट्रोलींग करण्यात आली. पेट्रोलींग दरम्यान मोटार वाहन तीन ट्रिपल सिट वाहन चालकावर कार्यवाही करण्यात आली.
असे नाईट गस्त चेकींग दरम्यान दोन आरोपी पकडुन त्याचेवर कायदेशिर कार्यवाही करण्यात आली. विनाकारण भटकणारे एकुण 28 व्यक्तींवर 110 / 117 म. पो. का कायदा प्रमाणे, तसेच तीन ट्रिपल सिट वाहन चालकावर कार्यवाही करण्यात आली.
सदरची कार्यवाही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री आबिनेश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी उप विभाग नांदेड शहर हे स्वतः व शहरातील चार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, गुन्हे शोधपथकाचे अंमलदार व आरसीपीचे अंमलदार यांनी पार पाडली.