श्रीमती नीति सरकार, डीआरएम/नांदेड यांनी मुदखेड स्टेशनची आणि गेट क्र. 155 येथील भुयारी पुलाची (RUB) च्या कामाची पाहणी केली
आज, 13 जून 2023 रोजी, श्रीमती. नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड विभाग/दक्षिण मध्य रेल्वे यांनी मुदखेड स्थानकाची आणि मुगट-मुदखेड विभागातील लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 155 च्या बदल्यात सुरू असलेल्या रोड अंडर ब्रिज (RUB) कामाची पाहणी केली.
सुरुवातीला श्रीमती. सरकार यांनी मुदखेड स्थानकाची पाहणी केली. श्रीमती. सरकार यांनी वेटिंग हॉल, सर्क्युलेटिंग एरिया आणि स्टेशन मास्टर ऑफिसला भेट दिली. श्रीमती. सरकारने कर्मचाऱ्यांना स्टेशनवरील स्वच्छता सुधारण्याच्या सूचना दिल्या आहेत. श्रीमती. सरकार यांनी त्यानंतर रेल्वे संरक्षण दलाच्या कार्यालयाला भेट दिली, सिग्नल आणि दूरसंचार आणि विद्युत मालमत्तेच्या स्थितीचा आढावा घेतला. श्रीमती. सरकार आणि इतर विभागीय अधिकार्यां नी पॉइंट्स आणि क्रॉसिंग, रिले रूम इत्यादी सुरक्षेच्या विविध बाबी देखील तपासल्या.
त्यानंतर डीआरएम मॅडम यांनी मुदखेड आणि मुगट दरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 155 च्या जागी होत असलेल्या भुयारी पुलाला (रोड अंडर ब्रिज-RUB) कामाला भेट दिली. त्यांनी येथे सुरू असलेल्या रिटेनिंग वॉल बांधणे, रस्ता, आरयूबीचे काम इ कामाचा आढावा घेतला. आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने या भुयारी पुलाचे (आरयूबीचे) उत्खनन आणि ड्रेनेजची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मुदखेड स्थानकाची पाहणी करताना श्रीमती. सरकार यांनी स्टेशनवरील रेल्वे विद्युतीकरणाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
श्री राजेंद्र कुमार मीणा, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी डीआरएम मॅडम यांच्यासमवेत होते.