महाराष्ट्रा
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वक्फ मालमत्तांची ऑनलाईन वेबपोर्टलचा शुभारंभ
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वक्फ मालमत्तांची ऑनलाईन-नोंदणी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या वेबपोर्टलचा आज शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे कार्यालय औरंगाबादला असून राज्यातील वक्फ मालमत्तांशी संबंधित प्रकरणांच्या कामकाजाच्या अनुषंगाने औरंगाबाद येथे जावे लागते. ही अडचण दूर करून वक्फ मालमत्तांशी संबंधित कामकाज ऑनलाईन पध्दतीने करण्याची सुविधा निर्माण व्हावी, या हेतूने https://mahawaqf.maharashtra.gov.in हे वेब पोर्टल विकसित केले आहे. आता ऑनलाईन नोंदणीची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वेबपोर्टल शुभारंभ कार्यक्रमास मंत्रिमंडळातील सदस्यांसह खासदार इम्तियाज जलील, फौजिया खान, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहद मिर्झा, सदस्य समीर काजी, मुदस्सीर लांबे आदी उपस्थित होते.