महाराष्ट्रा

खंडाळा घाटात टँकर पेटला, दोघे होरपळले, एकाचा मृत्यू

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटात ऑईल टँकरला भीषण आग लागली आहे. यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून या घटनेत दोघे होरपळले, एकाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 वाहतूक थांबवल्यामुळे मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. ही आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

अद्याप हा अपघात कसा घडला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. आगीचा भडका उडाल्याने द्रुतगती महामार्ग आणि त्याखालून जाणारा महामार्ग या दोन्ही महामार्गावर या आगीच्या झळा पोहचत आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button