मराठवाडा

बीडमध्ये भीषण अपघात; दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू!

बीडच्या अंबाजोगाई इथं भीषण कार अपघात झाला आहे. या अपघातात दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. डॉ. प्रमोद बुरांडे आणि डॉ. रवी सातपुते अशी या दोन डॉक्टरांची नावं आहेत. एका आरोग्य शिबिरावरुन घरी परतत असताना त्यांच्या कारला अपघात झाल्याचं कळतं आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, बीडच्या अंबाजोगाई इथं कारचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये डॉ. प्रमोद बुरांडे आणि डॉ. रवी सातपुते या दोन तरुण डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. दोघेही अडत इथं आरोग्य शिबिरासाठी गेले होते. तिथून परत अंबाजोगाईला परत येत असताना त्यांची कार सनई गावाजवळ झाडाला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दोन्ही डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button