महाराष्ट्रा

आवड म्हणून घरचा टेम्पो चालवायच्या, नाशिकच्या माधवी साळवे कशा बनल्या ST ड्रायव्हर

नाशिक : राजमाता जिजाऊ, पुण्याश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई ते सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु ह्यांच्यापर्यंत शेकडो स्त्रियांनी विविध क्षेत्रात आजवर आपली कामाचा ठसा उमटवला आहे, तसेच आपली कर्तबगारी दाखवली आहे. “चूल आणि मूल” यावर मर्यादित न राहता पाळण्याच्या दोरीसह, बसची बेलदोरी हाती धरत बस कंडक्टरची कामगिरी देखील सक्षमपणे पार पाडली. यादरम्यान, आता महिलांच्या हाती एसटी बसचे स्टेअरिंग देखील आलं आहे. नाशिकमधील अशीच एक महिला एसटी ड्रायव्हर सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.

माधवी संतोष साळवे (वय ३४) (बिल्ला. क्र.४१७४४ ) या नाशिकमधील पहिल्या एसटी ड्रायव्हर ठरल्या आहेत. एसटी महामंडळात २०६ महिला चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. माधवी यांची देखील एसटी ड्रायव्हर म्हणून नियुक्ती झाली आहे. खेड्यापाड्यात अवघड रस्त्यावर त्या अगदी सफाईदार पद्धतीनं बस चालवत आहेत. काल नाशिक ते सिन्नर या मार्गावर प्रथमच त्यांनी एसटी महामंडळाची बस चालवली.

गृहीणी ते बस ड्रायव्हर असा माधवी यांचा प्रवास आहे. नाशिकमधील धुडगाव येथे राहणाऱ्या माधवी या गृहीणी आहेत. माधवी यांना आधीपासूनच वाहन चालवण्याची आवड आहे. माधवी साळवे याअगोदर हौस म्हणून घरचा टेम्पो चालवायच्या. त्यानंतर त्यांना थेट एसटी महामंडळात ड्रायव्हरची नोकरी मिळाली आहे.

२०१९च्या भरती प्रक्रियेत २०६ महिला चालक तथा वाहक या पदासाठी निवडल्या गेल्या होत्या. एसटी महामंडळाने स्वत:च्या खर्चाने त्यांना हेवी व्हेईकलचे एक वर्ष ट्रेनिंग दिले. पुढे त्यांनी एक वर्ष हेवी व्हेईकल चालवण्याचा सराव केला. जो एसटीचा चालक बनण्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर त्यांची रीतसर एसटी बसवर चाचणी घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन सेवेत रुजू करून घेण्यात आलं आहे.

माधवी यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत देऊन तेवढ्यावरच न थांबता राज्य परिवहनने त्यांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी दिली आहे. एसटी महामंडळाच्या उपक्रमाची नागरिक प्रशंसा करत आहेत. महिला सक्षमीकरण्याच्या दिशेने हे आश्वासक पाऊल असल्याचंही बोललं जात आहे. सिन्नर आगारातील सर्व कर्मचारी तसेच नाशिक विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया माधवी यांनी यावेळी दिली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button