क्राईम

हिमायतनगर तालुक्यातील आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बारा वर्षाच्या मुलीस फुस लावून अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

 

नांदेड/हिमायतनगर। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे मौजे डोलारी येथील एका युवकांने येथील बारा वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन अत्याचार केला आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलिस ठाण्यात आरोपी युवकांवर पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आणि तात्काळ आरोपी युवकास पोलिसांनी अटक केले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात नदीकाठच्या मौजे डोल्हारी गावातील दुर्गेश राजू वट्टमवाड वय २० वर्ष या युवकांने याच गावातील 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीस लग्नाच आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल. आणि तिच्यावर अत्याचार केला हा प्रकार दिनांक २७ मे रोजी घडला होता. त्यावरून नातेवाईकांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गु.र. न. ११४/ २३ कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात नंतर वाढ करून दि. ३० मे रोजी संबंधित आरोपीला अटक केल्यानंतर कलम ३६६, ३७९ (२) सह पोस्को आणि अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला आहे.

अल्पवयीन मुलीला अमिश दाखवून आरोपी दुर्गेश राजू वट्टमवार याने अत्याचार केल्याप्रकरणी यास न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीश महोदयांनी पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास भोकर डिव्हिजन च्या उपविभागीय पोलिस अधीक्षक भोकर शफकत आमना या करीत आहेत. मागील8 दिवसांत हिमायतनगर तालुक्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची ही दुसरी घटना आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button