मराठवाडा
परभणी- जिल्ह्यात चंदन चोरांची टोळी सक्रिय,अकरा आरोपी 11 मोटार सायकल ताब्यात
परभणी जिल्ह्यात चंदन चोरांची टोळी सक्रिय झालीये, मानवत तालुक्यातील आंबेगाव शिवारातून अवैध रीतीने चंदन तस्करी करणार्या टोळीला वनविभागाने अटक केलीय. यात 11 आरोपीला ताब्यात घेण्यात आल असून त्यांच्या 11 मोटार सायकल 8 मोबाईल सह 235 किलो चंदनचिप्स आणि गोल चंदन 36 किलो जप्त करण्यात आलंय…आंबेगाव शिवारात शेतीला केलेल्या भिंतीच्या कुंपणाच्या आत मधून अनेक दिवसांपासून चंदन तोड ही टोळी करीत होती, या टोळीच्या मुसक्या आवळन्याचे काम वनविभागाने केले परभणी विभागीय वनविभागात ल्या चंदन तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरील कारवाईत सुमारे 15 लाख रुपयांच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या चंदन तस्कर टोळीकडून साठवणूक ठेवण्यात आलेले चंदन आणि इतर तपासण्याची प्रक्रिया वनविभागाचे अधिकारी करीत आहेत.