हेल्थ
आमदार भिमराव केराम यांच्या हस्ते डायलेसीस यंत्रणा केंद्रचे उद्धघाटन
किनवट (अकरम चौहान) विधानसभा क्षेत्रातील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे डायलेसिस यंत्रना गोकुंदा येथिल उपजिल्हा रुग्णालयात आमदार भिमराव केराम यांच्या भगीरथी प्रयत्नामुळे कार्यान्वित करण्यात आले असुन आज या डायलेसीस यंत्रणा( रक्त शुध्दीकरण केंद्र) चे उद्घाटन आमदार भिमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले असुन अशा प्रकारचे डायलेसीस केंद्र हे राज्यातील आदिवासी क्षेत्रातील एकमेव असे केंद्र असुन या करिता आमदार भिमराव केराम यांनी अतोनात प्रयत्न केले होते.
किनवट माहुर विधानसभा क्षेत्र हे जिल्ह्याच्या ठीकाणापासुन सुमारे १५० कि. मी. एवढ्या अंतरावर आहे त्यामुळे या तालुक्यातील गरीब व गरजु नागरीकांना आरोग्य विषयक सुविधा मिळवण्याकरिता जिल्ह्यातील रुग्णालयात हेलपाटे मारावे लागते त्यातही दळणवळणाच्या अत्यल्प साधनामुळे अशा रुग्णांचे आतोनात हाल होतात, नागरीकांना व रुग्णांना होणारे हे त्रास पाहता आ. केराम यांनी डायलेलीसचा उपचार घेत असलेल्या रुग्णाकरिता डायलेसीसची यंत्राणा तालुक्यात उपलब्ध करुन द्यावयाचे निश्चय केले व ते आज पुर्णत्वास हि नेले.
गोकुंदा येथिल उपजिल्हा रुग्णालयात अशा प्रकारच्या ३ मशिन सतत कार्यान्वित असणार असुन हा आजार असलेल्या रुग्णांना डायलेसीस चे उपचार सतत करत राहावे लागते, कधी कधीतर हा उपचार रोज करावा लागतो त्यामुळे अशा प्रकारच्या रुग्णांना हा उपचार विनामुल्य प्राप्त होणार असल्याने रुग्णांची यामुळे सोय झालेली आहे. त्यामुळे या सुविधे बद्दल डायलेसिस रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे.
या सोबतच आज गोकुंदा येथिल उपजिल्हा रुग्णालयात “३५० व्या शिवस्वराज्याभिषेक सोहळा निमित्त” भाजपाच्या युवा विकास फांउडेशन व भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट् प्रदेश व डॉ श्रीकांत पाटील तथा डॉ रिता पाटील यांच्या तर्फे मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये कॅन्सर तपासणी करिता फिरता दवाखाना या करिता आणण्यात आला होता. सदर कॅन्सर तपासणी शिबिरात ५० पेक्षा जास्त कॅन्सरग्रस्त रुग्णांनी तपासणी करुन शिबिराचा लाभ घेतला. विधानसभा क्षेत्रातील नागरीकांना आरोग्यविषयक सुविधा उच्च दर्जाच्या प्राप्त व्हाव्यात या करिता आ. केराम हे सदैव प्रयत्नशिल असतात त्यांच्या याच धोरणामुळे अशा दुर्जर आजाराचे उपचार जे या पुर्वी फक्त जिल्हा किंवा राजधानीच्या ठीकाणीच होत असत ते आता आपल्या किनवट सारख्या ठीकाणी नित्यनेमाने होणार आहे.
आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ ओव्हळ यांनी केले तर वैद्यकीय अधिक्षक डॉ मनोज घड्सिंग, डॉ ढोले, डॉ. भालेराव, डॉ साठे, डॉ केंद्रे, डॉ लोंढे, डॉ सरोदे, डॉ. शितल सोनाळे, डॉ सुनिल राठोड, डॉ. तोटावार, डॉ चंद्रे यांनी दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मोलाचे योगदान दिले. यावेळी भाजपा नेते अनिल तिरमनवार, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, माजी सभापती दत्ता आडे, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, ता. अध्यक्ष युवा मोर्चा उमाकांत कहाळे, विश्वास कोल्हारिकर, सतिष बिराजदार, माजी नगरसेवक शिवाजी आंधळे, विवेक केंद्रे, भावना दिक्षित, जय वर्मा, जगदिश तिरमनवार, शिवा क्यातमवार, राहुल दारगुलवार, सागर पिसारीवार यांच्यासह आयोजित शिबिर व कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात रुग्ण, आरोग्य कर्मचारी, परिचारक उपस्थित होते.