मोहन भागवतांच्या भेटीनंतर समीर वानखेडेंची चौकशी सुरु झाली, काहीतरी काळबेरं आहे: नाना पटोले
सोलापूर: सीबीआयकडून रोज पाच ते सहा तास समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे. त्यानंतर त्यांना असे वाटते आहे, की अतिक अहमदवर हल्ला झाला होता, तसाच समीर वानखेडे यांच्यावर देखील होऊ शकतो. त्यामुळे समीर वानखेडे हे आपल्या सुरक्षेसाठी आता मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे सुरक्षेची मागणी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. समीर वानखेडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन आले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट घेऊन आले. तरीही त्यांच्या मागे हा ससेमिरा का लागला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. समीर वानखेडेंच्या सीबीआय चौकशीत काहीतरी काळंबेरं आहे. दाल में कुछ काला है, असे नाना पटोले यांनी म्हटले. ते सोमवारी सोलापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
समीर वानखेडे हे संघ कार्यालयात गेले नसते तर त्यांच्या मागे चौकशीचा हा ससेमिरा लागला असता तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. वानखेडेंजवळ भाजपा आणि संघाची पोलखोल करु शकतात अशा काही वस्तू आहेत. त्यामुळे संघ मुख्यालयातून परत आल्यानंतर त्यांच्यापाठी चौकशीचा ससेमिरा लागला. सीबीआय आणि ईडी ही केंद्र सरकारची दोन माकडं आहेत. यापैकी सीबीआय समीर वानखेडेंची चौकशी करतं आहे. कालपर्यंत समीर वानखेडे यांना पाठिंबा देणारे भाजपचे लोक आता कुठे गेले, असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला.
आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंची चौकशी सुरू
शाहरुख खान यांचे सुपुत्र आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये चौकशी करत असतानाच बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याप्रकरणी सीबीआयने तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी सुरू केलेली आहे. तसेच समीर वानखेडे यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव देखील घेतलेली आहे. त्याची आज सुनावणी आहे. तसेच सीबीआयच्या कार्यालयात देखील त्यांची चौकशी सुरू आहे. परंतु त्यांना सुरक्षा हवी आहे, म्हणून मुंबई पोलीस आयुक्तांकडे ते आता सुरक्षेची मागणी केली आहे.
दालमे कुछ तो काला है: नाना पटोले
तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या जवळ भाजप किंवा संघाच्या विरोधात काही तरी पुरावे आहेत,म्हणून त्यांच्यामागे ,हा ससेमिरा लागला आहे. तसे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. समीर वानखेडे यांची सीबीआय कार्यालयात दररोज पाच ते सहा तास चौकशी सुरू आहे. समीर वानखडे यांना असे वाटत आहे की, उत्तर प्रदेशात ज्या प्रमाणे अतिक अहमदची पोलीस ताब्यात असताना, हत्या झाली ,तसाच प्रकार आपल्या सोबत होऊ शकतो अशी भीती समीर वानखडे यांनी कोर्टासमोर व्यक्त केली आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी ‘जरूर दाल मे कुछ तो काला है’,असा संशय व्यक्त केला.