नांदेड मनपा कडुन कृत्रिम पाणीटंचाई करून टँकर लॉबीचे चांगभलं
नांदेड दि.१८ मागील काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे पाणी वापर वापरात देखील वाढ झाली आहे. नांदेड महानगरपालिका द्वारे नागरिकांना पुरवण्यात येणारे नळाचे पाणी मुबलक साठा असून देखील दोन-तीन दिवस गॅप करून पुरवण्यात येते पण यामध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये महानगरपालिकेद्वारे चार-चार दिवस पाणी सोडले जात नाही त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. काही नागरिकांनी तर अशी ही शंका बोलून दाखवली की मनपा कर्मचारी,अधिकारी यांचे टँकर लॉबीसी साटेलोटे आहे की काय आणि टँकर लॉबीला आर्थिक फायदा पोहोचण्यासाठीच मनपाद्वारे मुद्दामहून मुबलकपणा पाणीसाठा असताना देखील कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे.
याकडे मनपाचे वरिष्ठ अधिकारी देखील लक्ष द्यायला तयार नाहीत. नांदेडमध्ये पाण्याचा एवढासाठा आणि स्त्रोत उपलब्ध असताना देखील नागरिकांना पाणी साठी वणवण भटकावे लागत आहे. मनपा पाणी कर पूर्ण वसूल करते, पण वर्षातून अर्धे दिवस देखील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करत नाही हे एक प्रकारे नागरिकांचे शोषणच आहे.तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.