मराठवाडा

मैत्रीच्या जगातील राजा – सत्यजीत टिप्रेसवार -१८ मे

सत्यजीत टिप्रेसवार हे आमचे मॉर्निंग वॉकचे सहकारी आहेत. ते दररोज सकाळी ४.३० वाजता उठून अगोदर घराबाहेर पडतात. आम्हाला वाॅकींगसाठी घराबाहेर पडण्याची फोन करून सुचना देतात. सुर्योदयापुर्वी भेटणारे आमचे पहिले मित्र ते आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त दोन शब्दात त्यांच्याविषयी लिहण्याचा योग आला आहे.  सत्यजीत टिप्रेसवार हे राज्य सरकारच्या आरोग्य विभागात सेवेतील आहेत. त्यांची आणि माझी मैत्री खूप जूनी नाही. मी सकाळी वाॅकींगला लवकर घराबाहेर पडत असे… मागेपुढे तेही येत असत ही गोष्ट जुलै २०२२ मधली आहे. परत येतांना ते रस्त्यात भेटत होते. तिथून ते आमच्या सोबत परत येत होते.  हळूहळू ते ऑगस्ट २०२२ पासून आमचे मॉर्निंग वॉकचे सहकारी झाले. मग ते आमच्या सोबतच येऊ लागले. अशी त्यांची आणि आमची मैत्री जमली. वाॅकींगहून मी सरळ जीम मध्ये वर्कआऊटसाठी जात होतो. तीन चार दिवसानी मी त्यांना जीममध्ये चला असा प्रस्ताव ठेवला मग दोघांचे जीममध्ये जाणे सुरू झाले. त्यांचा मुलगा चैतन्य जिमला येवू लागला. असा आमचा निरोगी आयूष्याचा प्रवास सूरू झाला.  साधारणतः डिसेंबर महिन्यात मला कामानिमित्त लातूर ईथ जायचे होते.

सत्यजीत यांना कार्यालयीन कामा निमित्त लातूरला जायचं होतं. आम्ही सोबतच प्रवास केला. मा प्रवासात त्यांचा स्वभाव कळण्यास मदत झाली.  पुढे मला
ट्रेकींगसाठी हिमालयात जायचे होते. याची मी जोरदार तयारी सुरू केली. यासाठी मला पर्वत चढण्याचा सराव करायचा होता. नांदेड शहरात एकही डोंगर नव्हता. जवळपास असलेले डोंगर रत्नेश्वरी आणि भोलेश्वर डोंगर आहेत. तेही आमच्या घरापासून १५-२० किलोमीटर अंतरावर आहेत. सकाळी तेवढ्या दूर जायच म्हणजे चारचाकी शिवाय पर्याय नव्हता. चारचाकी आम्हाला चालवता येत नव्हती. तेंव्हा आम्ही जपतजपत सत्यजीत यांना गाडी चालवण्याची विनंती कली. तेव्हा त्यांनी एका क्षणाचाही विचार न करता होकार दिला. सतत १२ दिवस त्यांनी आम्हाला मदत केली. ईतकच नाही तर आम्ही हिमालयात जात असतांना रेल्वे स्टेशनवर शुभेच्छा देण्यासाठी हजर होते. असा हा दिलदार मित्र मिळणे आजच्या काळात कठीण आहे. 👆🏾
सत्यजीत टिप्रेसवार यांचा एक चांगला गुण मला आवडतो. तो म्हणजे ते दररोज न चुकता अनेक मित्रांना वाढदिवसच्या शुभेच्छा देता असतात. त्यांच्या या कार्यामुळे ज्यांचा वाढदिवस आहे. त्या व्यक्तीला झोपेतून ऊठण्यापुर्वी अनेकाचे शुभेच्छा देणारे फोन जातात. एवढ्या सकाळी शुभेच्छा देणारा कोण हा शोध घेतला तर सत्यजीत यांच नाव पुढे येते. त्यामुळे ती व्यक्ती दिवस आनंदात उत्साहात वावरते. लगेचच सत्यजीत यांची मित्र होते. हे त्यांच जनसंपर्काच मोठ साधन आहे. त्या वापर ते सकारात्मक गोष्टीसाठी वापरतात.

सत्यजीत आपल्या कार्यात जवाबदारी वागतात. वेळात वेळ काढून कुटुंबात वेळ घालवतात. त्यांच्या पत्नी आणि आमच्या ताई सौ.रंजना टिप्रेसवार या त्यांना नेहमी प्रोत्साहन देतात.

कोरोना -१९ च्या संकट काळात त्यांनी अनेक रूग्णांना मदत केली. योग्य मार्गदर्शन देऊन धीर देण्याने, रूग्णांचे मनोधैर्य वाढविणे अशी काम अत्यंत जवाबदारीने केली.

उमरी (रे.स्टे) ग्रामीण भागात सर्व साधारण घरात जन्म झालेले व्यक्तीमत्व आणि ज्यांच्या नावात मध्येच सत्यची जीत म्हणजे सत्यजीत टिप्रेसवार …. हे आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक या पदावर ग्रामीण रुग्णालय, भोकर जि.नांदेड येथे कार्यरत आहेत. आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप) तालुका भोकर व मुदखेड चा प्रभारी म्हणून काम पाहतात. अत्यंत साधी राहणीमान… कायम एक बॅग गळ्यात अडकलेली दिसते. बॅगेमध्ये डायरी,पाण्याची बाॅटल,टिफीन,काही मेडिसिन, काही महत्वाचे कागदपत्रे कायम राहतात. या बॅग मध्ये नाही असे नाही. चलता चलता कुणाला त्रास असेल तर लगेच औषध गोळी देऊन मोकळे होता. थोडक्यात सत्यजीत यांच्याकडे नाही हा शब्दच नाही. सकारत्मक विचार नुसता बाळगूनच नाही तर ते विचार कृत्तीत उतरुन, कधी कुणाचे काम जमत असेल तर करणारा हा आमचा एक मित्र आहे. शक्य असेल तर मदत करुन बाजूला होणार. हा स्वभावगुण असलेल्या या आमच्या मित्राचा आज दि. १८ मे या दिवशी वाढदिवस आहे. या मित्राचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे. कारण सतत कुठल्या तरी कामात, कार्यात राहून स्वताः ला व्यस्त ठेवणारा माणूस आहे. यामुळे एक तर आयुष्यात जो रिकामा वेळ आहे. तो वायफळ जात नाही. कारणी लागतो. माणूस यामुळे क्रियाशील राहतो. या सर्व विविध जनसंपर्क कार्यातून एक एक माणूस जोडत जाणार सत्यजीत आहे. त्यांच्या या स्वभावामुळे माणस जोडत जातात.

मैत्री हीच संपती आहे. अस ते मानतात. ही संपती केवळ या मित्राकडे प्रंचड दिसून येते. सर्वांच्या सुख दुखःत वेळ काळ आला की धावून जातो. यामुळे ही मैत्री कायम टिकून दिवसेंदिवस वाढत जाते. मैत्रीच्या जगातील राजा माणूस म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते. यामुळेच सत्यजीत यांचे संघटन कौशल्य अतिशय उटून दिसते. त्यांचा स्वभावामुळे त्यांना विविध संघटना तसेच सामाजिक कार्यात सामावून घेतले जाते. ते राज्य हिवताप कर्मचारी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष आहेत. राज्य आरोग्य समन्वय समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख आहेत. या संघटनेचे राज्य पातळीवरचे पद व नांदेड जिल्हाध्यक्ष हिवताप कर्मचारी संघटना हे पद सत्यजीत यांच्याकडे आहे. ते नांदेड जिल्हा हिवताप कर्मचारी सहकारी पतपेढी म.नांदेडच्या सचिव पदाची जवाबदारी सांभाळत आहेत. तसेच ते हिवताप व हत्तीरोग कार्यालय कर्मचा-यांनी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक, सभासदांना यांच्या सहकार्याने दिर्घ मुदती कर्ज मर्यादा ७ लक्ष वरुन १० लक्ष झाली आहे. कर्मचारी बांधवांना याचा फायदा होणार आहे.

कोरोना-१९ विषाणू या महामारीच्या काळात आरोग्य सेवेमध्ये दिवस रात्र काम करत असतांना कोरोना विषाणू ची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत उपयुक्त व खात्रीशीर देत असत.

जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांच्याकार्यालयाकडून दररोज कोरोना-१९ बाबत प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात येते ती न चुकता व्हाट्सएपच्या व सोशल मीडिया च्या माध्यमातून विविध ग्रुपवर प्रसिद्ध करण्याच काम ते करत असत.

त्यांनी आपल्या सोबत शिक्षण घेतलेल्या वर्ग मित्र मैत्रीणीचा संपर्क साधून व्हाट्सएपचा ग्रूप तयार करून तो चालवत आहेत. तब्बल २० वर्षा दूरदूर गेलेले वर्ग मित्र मैत्रीण यांचे दि.२५ डिसेंबर २०१९ रोजी स्नेहसंमेलन घेण्यात आले होते. यामध्ये त्यांचा पुढाकार होता. हे स्नेह संमेलन एवढे आकर्षक झाले कि त्याची सर्वांनी स्तुत्य उपक्रम म्हणून प्रशंसा केली.

मागील वर्षी त्यांना ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनी भोकर येथील जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते कोरोनो काळात उल्लेखनीय काम केल्या बद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

जेथे गेले तेथे माणसे जमवण्याचा त्यांचा हातखंडा आहे. नायगांव येथे प्रभारी हिवताप पर्यवेक्षक म्हणून काम करतांना तालुक्यात हिवताप, हत्तीरोग व डेंग्यू जनजागरण कार्याक्रमात गावामध्ये प्रभावी आरोग्य शिक्षण देवून लोकामध्ये जनजागृती केली. नायगांव येथे त्यांच्या मित्र परीवार राजकीय, पत्रकार मित्र व पद्मशाली समाज बांधव यांचा मोठा मित्र परीवार आहे. तसेच पद्मशाली समाजाचे मराठवाडा पद्मशाली युवक संघटने सचिव हे अत्यंत महत्वाचे पद, नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख व मराठवाडा पद्मशाली कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष पद ही त्यांच्याकडेच आहे. यावरुन त्यांच्याकडे चांगले संघटन कौशल्ये आहे. हे सिद्ध झालेले आहे.

सत्यजीत टिप्रेसवार हे श्री साईबाबा शिर्डी यांचे ते निस्सीम भक्त आहेत. दरवर्षी श्रीराम नवमी उत्सव, श्री गुरुपौर्णिमा उत्सव व नवीन वर्षाचे स्वागत शिर्डी येथे मित्र परीवार सोबत साजरी करतात. सर्व सामाजीक कार्यात ही नेहमी सहभाग नोंदवत असतात. दरवर्षी दोन-तीन वेळा स्व ईच्छेने रक्तदान ही करत असतात. कोविड-१९ च्या अगोदर आपला वाढदिवस अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करुन गजानन मंदीर मालेगाव रोडला वृध्द आश्रमात साजरा केला. तिथल्या सर्व वृध्दांना मोठ्या उत्साहात सह परिवार अन्नदान करुन शासकिय कर्मचा-यांत नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात केली.
हिवताप व हत्तीरोग कार्यालयात आस्थापना, लेखा, तांत्रिक व संगणकीय विभागात कर्मचारी यांना काहीही अडचण आली तरी मदत करतात.
वरीष्ठ अधिकारी, सहकारी व कर्मचारी मित्र यांच्या मध्ये कायम सलोख्याचे,स्नेहाचे संबंध ठेवतात. हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी यांच्या अडीअडचणी विषयी वेळोवेळी वरिष्ठां सोबत चर्चा करून सांमजस्याने सर्व प्रश्न निकाली व सोडविण्याचा प्रयत्न करतात.
वरिष्ठ कार्यालय मुंबई, पुणे,नागपूर,लातूर व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य विभाग, हिवताप कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी ते समन्वयाचे त्यांचे संबंध आहेत.
आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध होणाऱ्या आरोग्य पत्रिका मध्ये नांदेड जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य/ काम यांचे ते माहिती संकलन करून प्रसिद्ध करतात. तसेच आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमी पत्रात सुध्दा आरोग्य विभागात वेळोवेळी घडणाऱ्या घडामोडींचा आढावा देतात.
राजकीय व्यक्ती, आकाशवाणी वार्ताहर, संपादक,पत्रकार,टि.व्ही. न्युज चँनेल प्रतिनिधी, वृत्तपत्र छायाचित्रकार यांच्या मोठा मित्र परीवार आहे.
या माणसाचा सर्वात चांगला गुण जर सांगायचा तर अलिकडे सर्व ठिकाणी प्रभावी ठरले ते सोशल मिडीया या माध्यमाचा दैनंदिन कामात व विविध क्षेत्रात कसा प्रभावी उपयोग करायचा ते आमच्या या मित्रा कडून शिकले पाहिजे. सर्वात आधी जर शासनाचे निर्णय इतर महत्वाची माहिती येत असेल तर सत्यजीत यांच्याकडे येते ते ही अत्यंत परफ्केट व अचूक माहिती यांच्या पोष्टच्या माध्यमातून असते.यामुळे कुठल्या ही शासकिय ग्रुपवर जर सत्यजीत यांनी पोष्ट टाकली तर ती अत्यंत विश्वनीय समजली जाते.हा सर्व ग्रुप सदस्यांचा विश्वास संपादीत केलेला आहे.शासनाची सर्व उपयूक्त माहिती कुठल्या ही वेळी बरोबर या मित्राकडे उपलब्ध राहणारच हे या काळातले समीकरण झालेले आहे.या वरुनच तांत्रीक माहितीचा किती सुंदर पध्दतीने उपयोग सत्यजीत टिप्रेसवार नेहमी करतात. हे सिध्द झालेले आहे.याचा फायदा सत्यजीत यांनी पध्दतशीरपणे संपर्काचे जाळे वाढविण्यासाठी केला.कुणी काय म्हणते या कडे लक्ष न देता सतत कार्य करणे. ऐवढेच उदिष्ट राहिल्यामुळेच कुठल्या ही कार्यात सत्यजीत टिप्रेसवार हे नाव येते.

सोशल मिडीया व्हाट्सएप, फेसबुक, टिव्टर, ईंस्टाग्राम यावर त्यांचा राजकीय व्यक्ती, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी व सामाजिक व्यक्ती यांचा मोठा मित्र परीवार आहे. यावर ते नेहमी वाढदिवस, लग्न वाढदिवस, निवड व अभिनंदन असे आर्वजून सर्वात अगोदर पोस्ट करतात.

ते ही बरोबर स्मरण करुन ग्रुपवर टाकली जाते ते या मित्राकडूनच सर्वांना कळते आज कोणाचा वाढदिवस/ लग्न वाढदिवस आहे. त्यामुळे मित्राची ही गोड आठवण जोपासली जाते,यामुळेच सर्वजण सत्यजीत टिप्रेसवार यांच्यावर विश्वास टाकतात.

ज्या ठिकाणी ते जातात तेथील अधिकारी व कर्मचारी यांना कायम आपलेसे करून सोडतात.

अशा या सर्वगुण संपन्न व्यक्तिमहत्व लाभलेल्या मित्राचा आज १८ मे वाढदिवस तसेच २० मे रोजी लग्नाचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या व विवाह वाढदिवसाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा…..

 

आनंद कल्याणकर, नांदेड, जेष्ठ पत्रकार,
संपादक, सा. मराठी स्वराज्य,
मा. आकशवाणी प्रतिनिधी,
९४२२१७०६९०

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button