क्राईम

एनसीबी कार्यालयातील ‘त्या’ एका सेल्फीमुळे समीर वानखेडेंचा खेळ उघड झाला

मुंबई: कॉर्डिलीया क्रूज ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अडकवण्याच्या बदल्यात शाहरुखकडे २५ कोटी रुपये लाचेची मागणी केल्याच्या आरोपाखाली एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र,जर आर्यनचा एनसीबीच्या कार्यालयातील एक फोटो समोर आला नसता तर हे प्रकरण उघड होऊ शकले नसते, अशी चर्चा सुरु झाली आहे. या सेल्फीमुळे समीर वानखेडे हे अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय होता तो फोटो?

आर्यन खान एनसीबीच्या कोठडीत असताना के.पी. गोसावीने त्याच्यासोबत काढलेला सेल्फी प्रचंड व्हायरल झाला होता. या सेल्फी प्रकरणांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या सेल्फीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच गोसावी हा एनसीबीचा अधिकारी नसतानाही आरोपी सोबत एनसीबीच्या ऑफिसमध्ये जाऊन कसा काय सेल्फी घेऊ शकतो, असा प्रश्न मालिकांनी उपस्थित केला होता. या सेल्फी प्रकरणानंतर समीर वानखेडे यांच्याभोवतीचे संशयाचे धुके गडद होऊ लागले होते.

केपी गोसावी आणि त्याचा साथीदार सॅम्युअल डिसोझा हे ड्रग्ज प्रकरणात साक्षीदार असताना वानखेडेंच्या नेतृत्वातील एनसीबीने त्यांना एनसीबी अधिकारी असल्यासारखे भासवले. आर्यन आणि त्याच्या मित्रांना केपी गोसावीच्याच कारमध्ये बसवून आणण्यात आले. तसेच केपी गोसावी आणि त्याच्या साथीदारांना कधीही एनसीबी कार्यालयात येण्याजाण्याची मुभा होती. त्यामुळे ते आर्यनसोबत बोलत असे, तसेच फोटोदेखील घेत असे.

या प्रकरणाची जेव्हा चौकशी चालू झाली तेव्हा पी. गोसावी याने एनसीबीसाठी शाहरुखकडे २५ कोटीच्या लाचेची मागणी केल्याची माहिती समोर आली. आर्यन याला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी शाहरुखकडे २५ कोटींची मागणी करण्यात आली होती. हे प्रकरण पुढे आल्याने एनसीबीची विशेष समिती याचा तपास करत होती. या समितीने ११ मे रोजी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयकडे अहवाल सादर केला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी १२ मे रोजी समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणात सीबीआय समीर वानखेडे यांना अटक करणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

समीर वानखेडेंनी मागितले २५ कोटी, १८ कोटींमध्ये सौदा ठरला

सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे की, समीर वानखेडे यांच्या इशाऱ्यावरुन किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला सोडण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडे २५ कोटींची मागणी केली आणि तडजोडीनंतर १८ कोटी रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. त्यापैकी ५० लाख रुपये के.पी. गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी स्वीकारले होते. मात्र, ते ५० लाख रुपये नंतर त्यांनी परत केल्याची माहितीही समोर आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button