हेल्थ

कडक उन्हात बाहेर फिरताय? काळजी घ्या! उष्मासोबतच या आजारांचाही धोका वाढला, जाणून घ्या लक्षणं

मुंबई : वाढत्या उष्म्याप्रमाणे विविध आजारांचा जोरही वाढता आहे. उष्णतेमुळे त्वचाविकार, डोळ्यांचे आजार, व्हायरल ताप, पोटदुखी, डोकेदुखी, चक्कर येण्यासारख्या शारीरिक व्याधी बळावल्या आहेत.

उष्ण आणि दमट तापमानात झालेल्या अचानक बदलामुळे महिला आणि मुलांमध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गाचे (यूटीआय) प्रमाण वाढले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ही समस्या जास्त दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत बहुतेक वेळा महिलांना यूटीआय संसर्ग झाल्याचे समोर येते. उन्हाळ्यातील उष्ण व आर्द्र हवामानामुळे हा त्रास होण्याचा धोका वाढतो. लघवी करताना जळजळ, लघवीतून रक्त पडणे, ओटीपोटात वेदना, मळमळ व उलट्या होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. युरोलॉजिस्ट डॉ. जितेंद्र साखराणी यांनी उन्हाळ्यातील प्रवास किंवा पाण्यात पोहणे या घटकांमुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये यूटीआय प्रकरणे वाढू शकतात, याकडे लक्ष वेधले. त्वचाविकारांमध्येही वाढ झाली असून त्वचेवर पुरळ, अंग लाल होणे, त्वचेवर चट्टे उमटणे, दाह होण्यासारख्या तक्रारी वाढल्या आहेत. यावर वैद्यकीय सल्ल्याखेरीज घेतलेल्या औषधांमुळे हा आजार बळावतो, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात.

पोटाची काळजी गरजेची मसालेदार, तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळेही पचनसंस्थेवर परिणाम होतो. अपचन, पोट बिघडणे, पोटदुखी तसेच पचनसंस्थेच्या अनेक तक्रारी या वातावरणामध्ये वाढतात. साधा पौष्टिक आहार, कमी तेलाचे पदार्थ, भरपूर पाणी, फळांचे सेवन केल्याने शरीरातील तापमान स्थिर राहते व उष्म्याचा त्रास जाणवत नाही, असे डॉक्टरांनी नमूद केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button