सुधीर सावंत यांचे वसमत नगरी मध्ये स्वागत
सैनिक फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष सेवानिवृत्त ब्रिगेडियर तथा मा. आमदार, मा.खासदार देशातील सर्व माजी सैनिकांचे प्रेरणास्थान भारतीय सेना मध्ये महिलांना भरती करण्यासाठी तत्कालीन सरकारला भाग पाडणारे तथा पुनर्नियुक्त माजी सैनिकांना योग्य सन्मान मिळऊन देनारे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शाळे मध्ये पी टी चा शिक्षक हा माजी सैनिक असावा हे शासनाकडून जीआर काढून मान्यता मिळवून देणारे आमचे मार्गदर्शक श्री सुधीर सावंत साहेब यांचे आज वसमत नगरी मध्ये स्वागत करते वेळी सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष तथा मा. उपनगर अध्यक्ष नगरपरिषद मुदखेड श्री लक्ष्मण देवदे . माजी सैनिक पुनर्गठन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा मुदखेड शहराचे कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी श्री हयून पठाण,
सैनिक फेडरेशनचे लोकप्रिय नांदेड जिल्हाध्यक्ष तथा ता.मुखेड येथील प्रसिद्ध “राजे छत्रपती अकॅडमी” सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्री ज्ञानेश्वर पाटील डुमणे, आज नव्यानेच सैनिक फेडरेशन महिला नांदेड जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेले सौ. ललिता कुंभार ताई, नांदेड जिल्हा सैनिक फेडरेशन चे मार्गदर्शक पदी मुदखेड येथील ज्येष्ठ माजी सैनिक प्रभू घोंगडे, सैनिक फेडरेशन मुदखेड तालुका मार्गदर्शक पदी श्री माधवराव पवार पाटील, यवतमाळ जिल्हा पोलीस मध्ये नव्यानेच नियुक्ती झालेले तसेच सैनिक फेडरेशन मुखेड शहराध्यक्ष पदी गोविंद कवटीकवार , व वसमत तालुक्यातील अनेक माजी सैनिकांची नियुक्ती केली, वरील नियुक्तीपत्र श्री ब्रिगेडियर सुधीरजी सावंत साहेब यांच्या हस्ते दिले आहे, सैनिक फेडरेशन च्या विभागीय कार्यक्रमासाठी वसमत तसेच हिंगोली जिल्ह्यातील शेकडो माजी सैनिक उपस्थित होते..