जिला

संतोष पांडागळे मराठी अपडेट कृतज्ञता पुरस्काराने सन्मानीत

 

नांदेड, दि.13- मागील दोन तपापासून राजकारण व पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत असलेले नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांना मराठी अपडेट माध्यम समुहाच्या वतीने कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
   मराठी अपडेट माध्यम समुहाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त येथील डॉ.शंकरराव चव्हाण नियोजन भवनात आयोजित केलेल्या एका भव्य सोहळ्यात माजी मंत्री डी.पी.सावंत व आ.मोहनअण्णा हंबर्डे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
  यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.विठ्ठल पावडे, उद्योजक मारोती कंठेवाड, बालाजी कंठेवाड, आयआयबीचे संतोष पाटील,मराठी अपडेटचे बापूसाहेब पाटील यांची उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button