मराठवाडा

धक्कादायक घटना सेफ्टी टॅंकची साफसफाई करत असताना गुदमरून मृत्यू… एकाची प्रकृती चिंताजनक रुग्णालयात उपचार सुरू

परभणी : सेफ्टी टॅंकची साफसफाई करत असताना गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत ही घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा परिसरामध्ये एका शेतामध्ये गुरुवार 11 मे रोजी मध्यरात्री घडली आहे. घटनेची माहिती मिळतात पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. तर एक जणांची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर परळी येथील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहे शेख सादेक, शेख जुनेद,शेख शारोक, शेख नवीद ,शेख फेरोज असे गुदमरून मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
परभणीच्या सोनपेठ तालुक्यामध्ये असलेल्या भाऊचा तांडा येथील  एका शेतामध्ये आहे शेख सादेक, शेख जुनेद,शेख शारोक, शेख नवीद ,शेख फेरोज, जमीर शेख शौचालयाच्या सेफ्टी टॅंकची साफसफाई करण्यासाठी गेले होते ते दुपारचे तीन वाजल्यापासून त्यांची साफसफाई करत असताना मध्ये रात्री उशिरा अचानक त्यांना गुदमरल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली हा प्रकार त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आली घटनेची माहिती मिळतात आरोग्य विभागाने रुग्णवाहिका भाऊचा तांडा येथे पाठवली.
यावेळी शेख सादेक, शेख जुनेद,शेख शारोक, शेख नवीद या पाच जणांना तातडीने परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आली मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री त्यांना उशिरा तपासून मृत घोषित केले तर जमीर शेख शेख यांना उपचारासाठी परळी येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर परळी येथे उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सोनपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. सोनपेठ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पवार यांनी देखील घटनेचे गांभीरे ओळखून रात्री घटनास्थळी उपचार करण्यासाठी तातडीने पथक पाठवले होते रात्री तीन वाजेपर्यंत ते स्वतः परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून होते.सेफ्टी टॅंकची साफसफाई करत असताना गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे हळूहळू व्यक्त केली जात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button