जिला

भरधाव ट्रकने चौफाळा येथील दोन तरुणांना चिरडले : बारड – नांदेड मार्गावरील घटना

12 May: 2023
नांदेड : भोकर येथे लग्न आटोपून नांदेडकडे परतत असताना भोकर – नांदेड मार्गाविर आज दुपारी भरदार ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत नांदेड येथील चौफाळा भागातील पंचशील नगरातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की युवकांचा छंदामेंदा झाला आहे.
नांदेड शहरातील चौपाळा भागातील पंचशील नगर येथील संदीप गौतम काळे आणि राहुल बाबुराव कोलते हे दोघेजण आपली बुलेट क्रमांक एम एच 26 बी झेड 2036 वरून आज लग्नासाठी भोकर येथे गेले होते. लग्न आटोपल्या नंतर भोकर येथून नांदेडकडे येताना सायंकाळी सहाच्या सुमारास बारड – भोकर फाटा मार्गावरील पेट्रोल पंपा नजदीक कन्हैया स्वीट मार्ट च्या समोर आर जे 14 जीपी 4757 क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या बुलेट ला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की बुलेट फरफटत गेली. सदरील दोन्ही तरुण ट्रकच्या चाकाखाली आले आणि दोन्ही तरुणांचा चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि नागरिक घटनास्थळी धावले होते . या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button