ऑटो मिटर दरामध्ये सुधारणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी
(मुनवर खान)
नांदेड जिल्हा ऑटो युनियन नांदेड संघटनेची मागणी
नांदेड दि. 25 प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड द्वारे एक परिपत्रक काढून जिल्ह्यातील सर्व ऑटोतील मीटर भाडेदरामध्ये सुधारणा करून नवीन दरानुसार मीटर रिकॅलिब्रेशन करण्यात यावे असे आदेश काढण्यात आले आहेत एवढ्या कमी कालावधीमध्ये सर्व ऑटो मधील मीटर मध्ये सुधारणा करून रीकॅलिब्रेशन करणे शक्य होणार नाही.
त्यामुळे सदरील आदेश हा मागे घेऊन पुढील चार ते पाच महिन्याची मीटर रिकालिब्रेशन साठी मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी नांदेड जिल्हा आटो युनियन नांदेड द्वारे करण्यात आली आहे. अनेक ऑटो चालकांना रीकॅलिब्रेशन करण्याचा आर्थिक भुर्दंड ही तत्काळ करणे शक्य होणार नाही तरी संबंधितांनी या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ऑटो भाडे वाढ मीटर रिकॅलिब्रेशन साठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष एम.ए. रहमान यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड व जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे.