देश विदेश

“पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार, पण तेव्हा त्यांनी मला गप्प केले”: सत्यपाल मलिक

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशाच्या राजकारणात खळबळजनक विधाने केली जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. या दावे आणि गौप्यस्फोटांमुळे राजकीय वातावरण तापताना दिसत आहेत.

अशातच आता जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी यांनी मोठा दावा केला आहे. पंतप्रधानांना सांगितले की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडले आहे. पण तेव्हा त्यांनी मला गप्प केले, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. एका कारमध्ये असलेल्या सुसाईड बॉम्बरने थेट जवानांच्या ट्रकला धडक दिली. यामध्ये तब्बल ४० CRPF जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे देशभर संताप उसळला होता. याच हल्ल्याच्या संदर्भात सत्यपाल मलिक यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सत्यपाल मलिक यांच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सत्यपाल मलिक सदर दावा करताना पाहायला मिळत आहेत.

पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार, पण तेव्हा त्यांनी मला गप्प केले

पुलवामा हल्ला झाला, त्यावेळी सत्यपाल मलिक जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांनी या मुलाखतीमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. सीआरपीएफने एअरक्राफ्टची मागणी केली होती. कारण एवढा मोठा ताफा कधीही रस्त्याने जात नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे त्यांनी मागणी केली. राजनाथजींकडे मागणी केली. पण त्यांनी नकार दिला. मला जर त्यांनी विचारणा केली असती, तर मी त्यांना एअरक्राफ्ट दिले असते. कसेही करून दिले असते. फक्त पाच एअरक्राफ्टची गरज होती, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. तसेच पुलवामा हल्ला झाला, त्या दिवशी पंतप्रधान मोदींशी झालेल्या संवादाबाबत सत्यपाल मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे. मी त्याच संध्याकाळी पंतप्रधानांना सांगितले की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडले आहे. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिले असते, तर हे घडले नसते. तर त्यांनी मला सांगितले की तुम्ही आत्ता शांत राहा, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे.

४० जवान तुमच्या सरकारच्या चुकीमुळे शहीद झाले

हे ट्विट करताना काँग्रसने मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, पुलवामा हल्ला आणि त्यात ४० जवान तुमच्या सरकारच्या चुकीमुळे शहीद झाले. जर आपल्या जवानांना एअरक्राफ्ट मिळाले असते, तर दहशतवाद्यांचा कट उद्ध्वस्त झाला असता. तुम्ही तर या चुकीसाठी कारवाई करणे अपेक्षित होते. पण तुम्ही हे प्रकरण फक्त दाबलेच नाही, तर स्वत:ची प्रतिमा जपण्याचा तुम्ही प्रयत्न केला. पुलवामावर सत्यपाल मलिक यांचा खुलासा ऐकून देश स्तब्ध झाला आहे, असे काँग्रेसने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button