देश विदेश

राष्ट्रीय रोजगार मेळ्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले नियुक्तीपत्रांचे वितरण

श्री कपिल पाटील, राज्यमंत्री पंचायत राज यांच्या हस्ते नांदेड येथे यांनी 369 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान

युवा वर्गाने आणि नव्याने नियुक्त झालेल्या शासकीय सेवकांनी देशाच्या विकासात भरीव योगदान देण्याचे केंद्रीय मंत्र्यांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित करत विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या उमेदवारांना सुमारे 71,000 नियुक्ती पत्रांचे वितरण केले.
नांदेड येथील नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीने आयोजित रोजगार मेळ्यात आयोजित समारंभात श्री कपिल पाटील, माननीय राज्य मंत्री पंचायत राज, भारत सरकार यांच्या हस्ते रेल्वे विभागातील 340 तर टपाल विभागातील 30 उमेदवारांना एकूण 369 उमेदवारांना नियुक्ती प्रमाण पत्रे प्रदान करण्यात आली. या प्रसंगी नांदेडचे माननीय खासदार श्री प्रताप पाटील चिखलीकर हे उपस्थित होते.
देशाच्या अर्थव्यवस्थेने जगात पाचव्या क्रमांकावर घेतली यात युवा वर्गाचे मोठे योगदान आहे असे सांगत देशाच्या विकासात विविध मंत्रालयातील नवनियुक्त उमेदवारांनी भरीव योगदान द्यावे असे आवाहन कपिल पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासासाठी करत असलेल्या कार्याची प्रशंसा आंतराष्ट्रीय स्तरावर होत आहे. नरेंद्र मोदी यांचे देशाप्रती असलेले प्रेम आणि ते देशाच्या विकासासाठी करत असलेली मेहनतीची आंतराष्ट्रीय माध्यमांनी दखल घेतल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या संस्कृतीचे, वारशाचे जतन करण्याचे मोठे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे, असे पाटील यांनी सांगितले.

श्रीमती नीती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की, माननीय पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या कार्यालयात रोजगार उपलब्ध करून देण्याची दूरदृष्टी दाखवून केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये 10 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले जात असून यामध्ये देशभरातील ४५ शहरांमधून पात्र तरुणांना आमंत्रित करण्यात आले आहे आणि त्यांना नियुक्तीपत्र दिले जात आहे. “रोजगार मेळा” रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, या मेळाव्याच्या आयोजनामुळे देशाच्या विकासासाठी होत असलेल्या कार्यात नवी ऊर्जा संचारेल. यामुळे विविध विभागांची कार्यक्षमता तर वाढेलच शिवाय देशाच्या आर्थिक विकासालाही गती मिळेल.

आज झालेल्या या रोजगार मेळाव्यात रेल्वे , बँक , संरक्षण मंत्रालय , टपाल, केंद्रीय राखीव सुरक्षा बल , हिंदुस्तान पेट्रोलियम , आदी विविध विभागातील नियुक्ती पत्रांचा समावेश आहे
यावेळी श्री उद्धव भोसले, कुलगुरू/स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिवर्सिटी/नांदेड, श्री शशिकांत महावरकर, डी.आई.जी/नांदेड, श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक/नांदेड, श्री अभिजित राऊत, जिल्हाधिकारी/नांदेड, श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी/जिल्हा परिषद/नांदेड, श्री श्रीकृष्ण कोकाटे, एस.पी./नांदेड, श्री आर.के.मीना, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक/नांदेड हे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

रोजगार मेळाव्याविषयी
रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेचे हा रोजगार मेळा एक पुढचे पाऊल आहे.
केंद्र शासनाने आतापर्यंत चार रोजगार मिळावे आयोजन केले असून यापैकी 22 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित पहिल्या मेळाव्यात 75 हजार 226 , 22 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित दुसऱ्या रोजगार मेळाव्यात 71 हजार 56 ,20 जानेवारी 2023 रोजी तिसऱ्या रोजगार मेळाव्यात 74,426 तर 13 एप्रिल 2023 रोजी आयोजित चौथ्या रोजगार मेळाव्यात 71 हजार 506 उमेदवारांना देशभरात नियुक्तीपत्र दिले आज झालेल्या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, सीनियर कमर्शियल क्लर्क कम तिकीट क्लर्क, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, ज्युनियर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, सीनियर ड्राफ्ट्समन, जेई/पर्यवेक्षक, सहाय्यक प्रोफेसर, शिक्षक, यांसारखी पदे तसेच ग्रंथपाल, परिचारिका, परिविक्षा अधिकारी, पीए, एमटीएस या पदांची नियुक्ती पत्रे देण्यात आली .
विविध सरकारी विभागांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या या सर्व कर्मचाऱ्यांसाठी असलेला ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम ‘कर्मयोगी प्रमुख’ या मंचाच्या माध्यमातून नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी मिळणार आहे .
या चारही ठिकाणी आयोजित कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह नियुक्त उमेदवार, त्यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button