सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; यावेळी मारण्याची तारीखही सांगितली
या फोनमुळे सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सलमान खानला याआधी फोन आणि मेलवर धमक्या आल्या. गँगस्टर लॉरेंन्स बिश्नोईचा या धमक्यांमागे हात असल्याचं म्हटलं जात आहे. मी केवळ धमक्या देत नाही तर त्या धमक्या मी लवकरच आमलात आणेल असं लॉरेंन्स बिश्नोईनं म्हटलं आहे.
सलमान खानला सतत येणाऱ्या धमक्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हेही
ज्यात सलमान खानशी बोलायचं असल्याचं म्हटलं गेलं होतं. रोहित गर्ग नावानं हा मेल आला होता. गोल्डू बरारला तुझ्या बॉसबरोबर बोलायचं आहे. त्याने इंटरव्ह्यू पाहिला असेल वाटतं.
नसेल त्याला पाहायला सांग. मॅटर क्लोज करायचा आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर बोलणं करून दे. समोरासमोर बोलायचं असेल तर तसंही सांग.
आधीच इन्फॉर्म केलं आहे. दुसऱ्या वेळेत थेट झटका मिळेल. सतत येणाऱ्या धमक्यांनंतर सलमान खाननं बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. या महागड्या कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सलमाननं खरेदी केलेली बुलेटप्रूफ कार भारतीय बाजारपेठेतही लाँच झालेली नाही. आपल्या जिवाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सलमान खानने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.