कै.गुरुवर्य हिरागीर मार्ग फलकाचे भागवताचार्य ह.भ.प नारायण महाराज आळंदीकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.
नांदेड दि.07 शहरालगत असलेल्या सांगवी – आसना बायपास-मल्हार चौक-तरोडा-खंडोबा चौक- रेड्डी गार्डन-मालेगाव रोड या रस्त्यास कै.गुरुवर्य हिरागीर मार्ग असा नामकरण ठराव नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सौ.करूणा भीमराव कोकाटे नगरसेविका यांनी मांडला. सभागृहात सर्वानुमते ठराव संमत करण्यात आलेला आहे. हनुमान जयंती च्या शुभ मुहूर्तावर भागवताचार्य ह.भ.प नारायण महाराज आळंदीकर यांच्या शुभहस्ते या रस्त्याच्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी प्रभागाचे नगरसेवक प्रतिनिधी श्याम पाटील कोकाटे यांचे सांगवी गावकऱ्यांनी आभार मानले.हिरागीर महाराज हे सांगवीच वैभव होते.आज पण त्यांची हजारो शिष्य मंडळी सांगवीत व आजूबाजूच्या गावामध्ये आहेत.
त्यांनी संपूर्ण जीवन हे जनसामान्यांच्या उद्धारासाठी घालवले असून आज पण समाजामध्ये त्यांचं नाव आदराने सन्मानाने घेतलं जातं. पुढच्या पिढीला देखील त्यांची आठवण राहावी व त्यांच्या विचारांचा वारसा पुढे असाच टिकावा या अनुषंगाने या रस्त्यास त्यांचं नाव दिलं आहे जे की पुढील शेकडो वर्ष पुढच्या अनेक पिढ्याला प्रेरणा देईल. असे मत नगरसेवक (प्र.) श्याम पाटील कोकाटे यांनी व्यक्त केले.याप्रसंगी हिरागीर महाराज यांचे नातू केदारगिरी महाराज, पुतणे गणेश गिरी महाराज, उपशहर प्रमुख शिवसेना माधव पाटील कोकाटे, युवक काँग्रेस महासचिव सत्यवान पाटील अंभोरे,
हनुमान मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडितराव कोकाटे, उपाध्यक्ष देविदासराव पवार, कोषाध्यक्ष सुभाषराव कोकाटे, आनंदराव कोकाटे, गोविंदराव कोकाटे, शिवाजीराव कोकाटे, उत्तमराव कोकाटे, मधुकर पवार, रमेशराव पवार, रामजी कोकाटे, चंपतराव कोकाटे, ज्ञानेश्वर कोकाटे, चंद्रकांत कोकाटे, प्रल्हाद कोकाटे, संभाजी कोकाटे, विजय भुक्तरे, गजानन कोकाटे, सतीश कोकाटे, शिवाजी कोकाटे, सचिन कोकाटे, शिवानंद गिरी, गणेश पवार, राजेश कोकाटे, विलास कोकाटे, अजय कोकाटे यांच्यासह गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.